Dr. Bharat Bhushan Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Farming : सेंद्रिय शेतीचे ५० वर्षांचे नियोजन आवश्‍यक

Dr. Bharat Bhushan : सेंद्रिय शेती पद्धतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढवावी लागेल. सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुलभ करावी लागेल,’’ असे प्रतिपादन उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील चेतना विकास स्वराज्य ट्रस्टचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. भारत भूषण त्यागी यांनी केले.

Team Agrowon

Parbhani News : ‘‘शिक्षण, संशोधन तसेच धोरणांद्वारे आगामी ५० वर्षांसाठी सेंद्रिय शेतीचे नियोजन करावे लागेल. सेंद्रिय शेती पद्धतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढवावी लागेल. सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुलभ करावी लागेल,’’ असे प्रतिपादन उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील चेतना विकास स्वराज्य ट्रस्टचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. भारत भूषण त्यागी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित पाच दिवशीय सेंद्रिय शेती प्रशिक्षणाचे उद्‍घाटन मंगळवारी (ता.१३) झाले. या वेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी अध्यक्षस्थानी होते. संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. गोविंद गुजर, सूक्ष्म जीवशास्त्र शास्त्रज्ञ, डॉ. लिवलीन शुक्ला,

वनस्पतीरोग शास्त्रज्ञ डॉ. दीबा कामिल, कृषिभूषण सूर्यकांतराव देशमुख झरीकर, सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे मुख्य संशोधक डॉ. आनंद गोरे, डॉ. पपिता गौरखडे, प्रा. प्रीतम भुतडा आदी उपस्थित होते.

डॉ. मणी म्हणाले, ‘‘निसर्गानुकूल शेतीचे तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, शेतकरी यांच्या समन्वयातून सेंद्रिय शेतीची चळवळ निर्माण करावी लागेल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gram Sowing : खानदेशात हरभरा पेरा स्थिर राहण्याचे संकेत

BBF Technology : बीबीएफ तंत्रज्ञान उपयुक्त : डॉ. मायी

Crop Subsidy : कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ३० हजार, बागायतीसाठी ७० हजार रुपये अनुदान द्या

Farmer Crisis : करपलेल्या ४० एकर सोयाबीनवर फिरवला नांगर

Sugarcane Crushing Season: दुष्काळात उसासाठी कारखान्यांची चढाओढ

SCROLL FOR NEXT