Ginger Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Ginger Crop : आले पिकांच्या दरात 5 ते 7 हजारांची घट

Ginger Rate : आले पिकांला मागील काही महिन्यांपासून चांगला दर मिळत होता. मात्र, सध्या दरात अल्प प्रमाणात घट झाली आहे. मागील १५ दिवसांच्या तुलनेत पाच ते सात हजार रुपयांनी घट झाली आहे

Team Agrowon

Satara News : आले पिकांच्या दरात अल्प प्रमाणात घट झाली आहे. सध्या आल्यास प्रतिगाडीस (५०० किलो) ५० ते ५५ हजार रुपये दर मिळत आहे. त्यात मागील १५ दिवसांच्या तुलनेत पाच ते सात हजार रुपयांनी घट झाली आहे. नवीन आले बाजारात येण्यास वेळ असल्याने अजूनही दरात वाढ होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी पीक काढत नसल्याची स्थिती आहे.

आले उत्पादक शेतकऱ्यांना २०२३ हा वर्ष सुखकारक ठरले आहे. या पिकास गेल्या दोन महिन्यांपासून विक्रमी दर मिळाला. दर स्थिर असल्याने आले उत्पादकांना दिलासा मिळाला होता. उत्पादनात झालेली घट आणि बाजारात वाढलेली मागणी, यामुळे गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत आल्याला यंदा सर्वाधिक दर मिळाला आहे. जून महिन्यात आले पिकाच्या प्रतिगाडीस मालाच्या प्रतवारीनुसार ५८ ते ६० हजार रुपये दर मिळाला आहे.

गेल्या चार वर्षांत आल्याच्या दरात कमालीची घसरण होत होती. त्यामुळे उत्पादकांना सलग पाच ते सहा वर्षे मोठा आर्थिक फटका बसला. दराच्या घसरणीच्या कालावधीत चांगला नफा मिळेल, या आशेने शेतकरी लाखो रुपयांचा भांडवली खर्च करत होते. मात्र, बाजारात योग्य दर मिळत नसल्याने आले पीक आतबट्ट्याचे ठरत होती; परंतु यंदा जानेवारीपासून आल्याच्या दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने दरात सुधारणा होत गेली.

आले लागवडीसाठी आले बियाणे काढणी सुरू असताना आले (धुणीच्या) दरात आणखी वाढ झाली. या काळात बियाण्याचे दर ३५ ते ३६ हजार रुपये प्रतिगाडीस मिळत होते. यावेळी धुणीच्या आल्याचे दर २८ ते २९ हजारांवर गेले होते. एप्रिलच्या सुरवातीला दरात पुन्हा सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे. मे महिन्यात आले पिकास उच्चांकी म्हणजे प्रतिगाडीस ६० ते ६५ हजार रुपये दर मिळाला. जूनमध्येही दर टिकून राहिले. जुलैमध्ये ५८ ते ६० हजार रुपये दर राहिले. सध्या प्रतिगाडी ५० ते ५५ हजार रुपये दर आहेत.

नव्या-जुन्यामुळे आर्थिक नुकसान

काही व्यापाऱ्याकडून आले खरेदी करताना पुन्हा विभागणी केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून थेट खरेदी ठिकाणी जाऊन जाब विचारला जात आहे. तसेच आले एकत्रित खरेदी करण्यासाठी सूचना दिल्या जात आहेत. मात्र काही ठिकाणी नवे-जुने खरेदी गुपचूप पद्धतीने केली जात आहे. दर कमी होईल या भीतीने शेतकरी गप्प बसत असल्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT