Benefit of Fruit Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविम्याचे ४७२ कोटी ५१ लाख वितरित

Latest Agriculture News : मागील वर्षी खरीप हंगाम २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाले होते.

Team Agrowon

Nanded News : मागील वर्षी खरीप हंगाम २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील १० लाख ५७ हजार ५०८ शेतकऱ्यांनी सहा लाख ५१ हजार ४२२ हेक्टर क्षेत्रावर पीकविमा उतरविला होता.

यात अधिसूचनेनुसार ३६६ कोटी ५० लाख रुपये व स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्‍चात नुकसान या घटकांतर्गत १०६ कोटी, असे एकूण ४७२ कोटी ५१ लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.

नांदेडला प्रधानमंत्री पीकविमा योजना युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविली जाते. शेतकऱ्यांना नुकसानीच्या २५ टक्के आगाऊ रक्कम मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोयाबीन, खरीप ज्वारी, कापूस व तूर पिकांसाठी मिड सीझन डायव्हर्सिटीची अधिसूचना लागू केली होती.

या अधिसूचनेनुसार विमा कंपनीने ३६६ कोटी ५० लाख रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. याचबरोबर पीकविमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्‍चात नुकसान या घटकांतर्गत प्राप्त पूर्वसूचनांचे पंचनामे करून तिसऱ्या हप्त्यात अनुक्रमे ९९ कोटी ६५ लाख रुपये व ६ कोटी ३६ लाख रुपये रक्कम वाटप करण्यात आली आहे. सन २०२२-२०२३ मध्ये विविध घटकांतर्गत एकूण ४७२ कोटी ५१ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत.

७५ टक्के भरपाईची वेगळी तरतूद नाही

पीक कापणी प्रयोगानुसार उंबरठा उत्पादनावर आधारित पीकविमा ज्या महसूल मंडलांना लागू होईल अशा सर्व संबंधित शेतकऱ्यांना जी रक्कम वाढीव मिळेल ती यानंतर जमा करण्यात येते.

या व्यतिरिक्त ७५ टक्के नुकसान भरपाई अशी कुठल्याही प्रकारची वेगळी तरतूद पीकविमा योजनेत नाही. शेतकऱ्यांनी चुकीच्या संदेशाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT