Ratnagiri Market Committee Agrowon
ॲग्रो विशेष

Ratnagiri Apmc Election Update : रत्नागिरी बाजार समितीच्या १७ जागांसाठी ४६ अर्ज

रत्नागिरी बाजार समितीच्या १७ जागांसाठी ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

Team Agrowon

Ratnagiri News : रत्नागिरी बाजार समितीच्या (Ratnagiri Market Committee) १७ जागांसाठी ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये सर्वपक्षीय सहकार पॅनेल बनविण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरीही अपेक्षित जागा न मिळाल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून पंधरा जागांवर उमेदवार उभे केल्यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे.

सहकार क्षेत्रातील महत्त्वाची निवडणूक म्हणून बाजार समितीकडे पाहिले जाते. या निवडणुकीतही शिवसेना शिंदे गटासह ठाकरे गटाकडूनही अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

यापूर्वी सर्वपक्षीय सहकार पॅनेल उभे केले जात होते. त्यामुळे बहुसंख्य जागा बिनविरोध होत होत्या. यंदाही त्यादृष्टीने नियोजन सुरू झाले आहे; इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि आर्थिक दुर्बल घटक या दोन जागांसाठी एकही अर्ज भरला गेलेला नाही.

व्यापारी गटातून दोन जागांसाठी दोनच अर्ज आले. १५ जागांसाठी निवडणूक निश्‍चित झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांचे सहकार पॅनेल निश्‍चित झाले आहे. ठाकरे गटालाही यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी चर्चा सुरू आहे.

पॅनेलचे अधिकार जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याकडे देण्यात आले. अर्ज माघारीची मुदत २० एप्रिलपर्यंत आहे. तोपर्यंत पॅनेलमध्ये सहभागी होण्याचा निर्णय ठाकरे गटाकडून अपेक्षित आहे.

सहकार पॅनेलसाठी आम्ही सकारात्मक आहोत; परंतु किती जागा मिळाव्यात याचे सर्वाधिकार जिल्हाप्रमुख विलास चाळके, आमदार डॉ. राजन साळवी यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत.
संदीप सुर्वे, प्रतिनिधी, ठाकरे गट शिवसेना
निवडणूक होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय सहकार पॅनेल करण्यात आले आहे. यामध्ये ठाकरे गटालाही समाविष्ट करून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.
गजानन पाटील, शिवसेना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT