Strawberry Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Washi APMC : वाशी बाजार समितीत स्‍ट्रॉबेरी प्रतिकिलो ४५० रुपये

Strawberry Rate : एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीला आवक कमी असल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात स्ट्रॉबेरी चांगलाच भाव खात आहे.

Team Agrowon

Washi News : एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीला आवक कमी असल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात स्ट्रॉबेरी चांगलाच भाव खात आहे.

आंबट-गोड चवीच्या स्ट्रॉबेरीला घाऊक बाजारात प्रतिकिलो ४५० रुपये भाव मिळत असून ६० रुपयांना १०० ग्रॅमचा वाटाही किरकोळ बाजारात मिळत आहे. भाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारीही सुखावले आहेत.

बाजारात साधारण नोव्हेंबरपासून स्ट्रॉबेरीची आवक होण्यास सुरुवात होते. दिवाळीनंतर वातावरणात गारवा जाणवू लागला असतानाच बाजारात लालचुटुक, आंबट-गोड अशी स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. वाशीतील एपीएमसी फळ बाजारात शुक्रवारी ११४ क्विंटल स्ट्रॉबेरीची आवक झाली.

ही आवक सध्या किरकोळ असल्याचे व्यापारी सांगतात. जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत मोठ्या प्रमाणात आवक होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. यंदा स्ट्रॉबेरीचे उत्पादन चांगले झाल्याने मालाला चांगला भाव मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सध्या घाऊक बाजारात आकारमान आणि गुणवत्तेनुसार स्ट्रॉबेरीला ३५० ते ४५० प्रतिकिलो इतका भाव मिळत आहे; तर किरकोळ बाजारात ४५० ते ६०० रुपये किलोने स्ट्रॉबेरी विकली जात आहे. त्याचप्रमाणे ६० रुपये १०० ग्रॅमचा वाटादेखील विक्रीस उपलब्ध आहे.

त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला स्ट्रॉबेरी उत्पादकांना याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर, पाचगणी, वाई ही स्ट्रॉबेरी उत्पादनाची मुख्य केंद्रे मानली जातात. नाशिकच्या शेतकऱ्यांचाही प्रयोग यशस्वी केल्याने उत्पादन वाढण्यास मदत झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT