Paddy Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Plantation : गोंदिया जिल्ह्यात ४३ हजार हेक्‍टरवर उन्हाळी धान

Summer Paddy Farming : यंदा गोंदिया जिल्ह्यात ४३,११२ हेक्‍टरवर धानाची लागवड होणार असल्याची शक्‍यता असल्याने त्यानुसार कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Gondiya News : खरिपातील धानाची कापणी झाली असताना आता रब्बी हंगामातील धान रोवणीच्या तयारीत शेतकरी लागले आहेत. यंदा जिल्ह्यात ४३,११२ हेक्‍टरवर धानाची लागवड होणार असल्याची शक्‍यता असल्याने त्यानुसार कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.

पूर्व विदर्भात तांदळाचे सर्वाधिक क्षेत्र असल्याने गोंदियाला राईस सिटी असेही म्हटले जाते. येथील तांदळाला देश-विदेशात मागणी असून परिणामी शेतकऱ्यांकडूनही दर्जा राखण्यावर भर दिला जातो.

खरिपात चांगले उत्पादन घेतल्यानंतर आता शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीत लागले आहेत. त्यापूर्वी शेतीतील श्रमामुळे येणारा थकवा घालविण्यासाठी मंडईचे आयोजन ग्रामीण भागात होते. त्या माध्यमातून मनोरंजनाची सोय उपलब्ध होते. तोही काळ संपल्यानंतर आता नव्या जोमाने शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीत गुंतले आहेत. कृषी विभागाकडून यंदा ४३,११२ हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी धानाचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात शेतकरी धानासोबतच अन्य रब्बी पिकेही घेतात. त्यानुसार २२३२ हेक्‍टर क्षेत्रावर गव्हाची लागवड होईल, अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत ५९ हेक्‍टरवरच गव्हाची लागवड झालीआहे. ९७ हेक्‍टर क्षेत्रात मका लागवड असणार आहे.

सर्वाधिक अर्जुनी मोरगावला लागवड

रब्बी हंगामात ४३,११२ हेक्‍टरवर धान लागवड होणार आहे. याचे वर्गीकरण केल्यास देवरी तालुक्‍यात सर्वात कमी म्हणजे २४०८ हेक्‍टर, तर अर्जुनी मोरगाव तालुक्‍यात सर्वाधिक १०,७६४ हेक्‍टरवर धान लागवड होईल. गोंदिया तालुक्‍यात ७६८६, गोरेगाव ३२९९, तिरोडा ४२८४, आमगाव ३५८७, सालेकसा ४८६२, सडक अर्जुनी तालुक्‍यांत ६३०० क्षेत्रावर धानाची लागवड होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leader of Opposition: वादळी चर्चेच्या केंद्रस्थानी विरोधी पक्षनेता

India US Trade Deal: भारताच्या अमेरिकेसोबतच्या व्यापारात होणार वाढ

Japan Election 2026: जागतिक ‘फॅसिझम’चा जपानी अवतार

Farm Income 2026: उत्पन्नवाढीसाठी कापूस बोंडांचे वजन वाढणे गरजेचे

Farm Scheme: कृषी योजनांचा फुसका बार

SCROLL FOR NEXT