Protsahanapar' Government Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Incentive Scheme : कर्जमुक्ती प्रोत्‍साहन योजनेचा ४२४ शेतकऱ्यांना लाभ

Loan Waive Scheme : महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन लाभ योजनेत बसलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे.

Team Agrowon

Satara News : महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन लाभ योजनेत बसलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. यामध्ये ४२४ शेतकऱ्यांच्या खात्यांवर तब्बल एक कोटी ६२ लाख रुपये जमा झाले आहेत. घटस्थापनेच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कर्जमाफी योजनेत न बसलेले; पण वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या तीन टप्प्यात पैसे मिळाले; पण ज्यांची केवायसी व आधार प्रमाणीकरण झालेले नव्हते, त्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळालेला नव्हता. त्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याची सूचना केली होती.

राज्यातील ३३ हजार ३५६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण नसल्याने ऑगस्टमध्ये निदर्शनास आणले होते. त्यामुळे त्यांना लाभ मिळाला नव्हता. यामध्ये जिल्ह्यातील ४२४ शेतकऱ्यांचा समावेश होता. या शेतकऱ्यांना १२ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करण्याची संधी दिली होती.

त्यानुसार प्रमाणीकरण केलेल्या ११ हजार ८३६ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर ४६.७० कोटी रुपये लाभाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ४२४ शेतकऱ्यांच्या खात्या एक कोटी ६२ लाख रुपये वर्ग झाले आहेत.

आता जे शेतकरी आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी मृत झाले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या वारसांची नावे योजनेच्या पोर्टलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण करून त्यांनाही योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रिक यांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

Akola Heavy Rainfall: अकोला जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सून पावसाची दमदार हजेरी

Seed Ball Making: सीड बॉल निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Marathwada Rain 2026: छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT