Yavatmal News : जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पांत ४२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी हा जलसाठा २३ टक्क्यांवर होता. त्यामुळे यंदा नागरिकांवर टंचाईचे सावट दिसत नाही.
जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. कधी दुष्काळ कृत्रिम असतो, तर कधी नैसर्गिक. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने नदी, नाले व प्रकल्पात बराच जलसाठा शिल्लक आहे. दरवर्षी शेतकऱ्यांपासून तर प्राण्यांनाही टंचाईची झळ सोसावी लागते.
जिल्ह्यात काही भागात तीव्र पाणीटंचाई होती तर काही भागातील नागरिकांना काही प्रमाणात टंचाईचे चटके बसले. शहरात जीवन प्राधिकरणाचा पाणीपुरवठा तर आठ दिवसांनी होतो. अनेकांना तर पाण्यासाठी रात्रंदिवस दूरवरून पाणी आणावे लागत होते. लघु जलाशय कोरडे झाले होते.
मात्र, यावर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याची चणचण भासणार नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात पूस, अरुणावती, बेंबळा हे मोठे प्रकल्प आहेत.
अडाण प्रकल्प, नवरगाव, गोकी प्रकल्प, वाघाडी, सायखेडा, अधर पूस आणि बोरगाव असे सात मध्यम प्रकल्प आहेत. जिल्ह्यातील पूस, अरुणावती, बेंबळा या मोठ्या प्रकल्पांत आजच्या स्थितीला १८९.५३ दलघमी म्हणजे ४२.६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
मध्यम प्रकल्पांतील अडाण प्रकल्पात ५३.३८ दलघमी, नवरगाव ३५.१८ दलघमी, गोकी प्रकल्प ५१.६३ दलघमी, वाघाडी ५१.५६ दलघमी, सायखेडा ४७.६५ दलघमी, अधर पूस ६५.४७ दलघमी आणि बोरगाव २३.७५ दलघमी असे एकूण सात प्रकल्पांत ५३.३९ टक्के जलसाठा आहे.
गेल्यावर्षी २३ टक्केच जलसाठा
गेल्यावर्षीची याच दिवसांची स्थिती पाहिल्यास २३.१७ टक्के पाणी होते. त्या तुलनेत आजच्या स्थितीत जलसाठा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे यंदा नागरिकांना टंचाईची शक्यता कमी आहे. मोठे, मध्यम तसेच लघु प्रकल्पांत गेल्यावर्षीच्या तुलनेत स्थिती समाधानकारक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.