MSRTC  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune ST Buses: पुणे विभागात नवीन ४० एसटी बस दाखल

MSRTC : पुणे विभागातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्यातील प्रवासी गर्दी लक्षात घेऊन पुणे एसटी विभागात ४० नवीन बस दाखल झाल्या आहेत. स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती आगारांना प्रत्येकी १० नवीन बस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक चांगली आणि सुरक्षित सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: उन्हाळ्यात प्रवाशांची गरज लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागात ४० नवीन एसटी बस दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या आगारांना प्रत्येकी दहा बस देण्यात आल्या असून, प्रवाशांसह एसटी प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

पुणे एसटी विभागातून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या तुलनेत बसची संख्या कमी होती, त्यात काही बस जुन्या झाल्यामुळे त्या वारंवार बंद पडत असून, काही बस स्क्रॅप करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे एसटी प्रशासनाच्या बसच्या वेळा आणि संचलनाचे नियोजन करताना चांगलीच तारेवरची कसरत होते. मार्च महिन्याच्या सुरुवातीला पुणे विभागातील एसटीच्या ताफ्यात २० बस दाखल झाल्या आहेत, तर आणखीन ४० बस (लालपरी) दाखल झाल्याने एसटी प्रशासनाने समाधानाचा सुस्कारा सोडला आहे.

बसची संख्या वाढल्याने प्रवाशांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. मागील काही दिवसांपासून एसटीचा उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांची वाढती संख्या आणि जुन्या एसटी स्क्रॅप होण्याचे वाढते प्रमाण पाहता, अजून किमान १०० नवीन बस तरी पुणे एसटीच्या ताफ्यात येणे अपेक्षित आहे. जेणेकरून वाढत्या गर्दीला सुरक्षित आणि वेळेत बससेवा देता येईल.

दरम्यान, पुढील काही दिवसांत विभागातील सर्व आगारांत नव्या बस दाखल होणार आहेत. त्यामुळे पुणे एसटी विभागातील बसची संख्या वाढणार असून, जुन्या बसमुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी होणार आहे, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुणे विभागाला २१५ गाड्यांचा निर्णय

पुणे एसटी विभागातून पूर्वी ५० ते ६० हजार प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये ३० ते ४० हजार प्रवाशांची वाढ झाली आहे. महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनांमुळे एसटीची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे विभागाला नव्या २१५ गाड्या पुणे विभागाला देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्या टप्प्याटप्प्याने दाखल होत असून, उन्हाळी हंगाम सुरू होण्याआधी बस दाखल झाल्या, तर प्रवाशांना त्याचा फायदा होईल.

सध्या पुणे विभागात नव्याने ४० बस दाखल झाल्या आहेत. या बस स्वारगेट, शिवाजीनगर, बारामती आणि इंदापूर या चार आगारांना प्रत्येकी दहा बस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना नवीन बसमधून चांगली आणि सुरक्षित सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
सचिन शिंदे, वाहतूक अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra River Rejuvenation: अखेर नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

POCRA Research Agreement: ‘पोकरा’अंतर्गत संवर्धित शेतीसाठी संशोधन करार

Supe Water Supply Scheme: डोक्यावरील हंडा उतरणार !

Revenue Officer Corruption: उपळाईचा मंडल अधिकारी लाच घेताना अटकेत

Rural Development: लोकाभिमुख होऊन गावांची विकासकामे करा: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT