Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Crop Damage: पुरंदर तालुक्यात पावसामुळे पिकांचे ३८३ हेक्टरचे नुकसान

Farmer Issue: मे महिन्यात मॉन्सूनपूर्व व मॉन्सूनच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली होती. यामुळे पुरंदर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Saswad News: मे महिन्यात मॉन्सूनपूर्व व मॉन्सूनच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली होती. यामुळे पुरंदर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामध्ये तालुक्यातील ३८३ हेक्टर वरील विविध फळ आणि पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे १३९४ शेतकरी बाधित झाले आहेत.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनी दिली आहे.पुरंदर तालुक्यात १५ मे नंतर पाऊस सुरु झाला तर २० मे नंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

यामध्ये अंजीर, सीताफळ, कांदा तसेच विविध तरकारी आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली होती. तसेच संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती असल्याने शासनाने तातडीने सर्व राज्यातील पंचनामे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये ६१. ७१ हेक्टर क्षेत्र जिरायती असून यामध्ये १०७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे ३५४. ६१ हेक्टरक्षेत्र बागायती असून ७६१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर ३८. ७० हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाल्याने ७९ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

पंचनाम्यानुसार पिकांचे झालेले नुकसान, हेक्टरमध्ये :

पीक (नुकसान हेक्टरमध्ये) भाजीपाला -३०५.७, फळ -३३.४०, कांदा - ११.३० , फूल- ३३.२०, जमीन वाहून जाणे - १३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT