Livestock Census  Agrowon
ॲग्रो विशेष

Livestock Census : ‘पशुगणने’ला सुरुवात; सर्व्हेक्षणासाठी ३७५ कर्मचारी

Livestock Census Update : केंद्र शासनाने २१ व्या पशुगणनेची घोषणा केल्यानंतर ४ नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात गणनेला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातही या कामाला प्रारंभ झाला आहे.

Team Agrowon

Solapur News : केंद्र शासनाने २१ व्या पशुगणनेची घोषणा केल्यानंतर ४ नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात गणनेला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातही या कामाला प्रारंभ झाला आहे. त्यासाठी सोलापूर शहरात ८२ आणि ग्रामीणमध्ये २९३ प्रगणक सर्व्हेक्षण करणार आहेत.

या आधी २०१९ मध्ये २० वी पशुगणना झाली होती. पण या पशुगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे मोबाइल अॅपसह माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे. सोलापूर शहरात प्रत्येकी ४ हजार घरांमागे आणि ग्रामीण भागात तीन हजार घरांमागे एक याप्रमाणे प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेषतः शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. २०१९ मध्ये झालेल्या २० व्या पशूगणनेनुसार जिल्ह्यामध्ये २२७३ गाढवे आहेत. तर १२ लाखांवर गाई, म्हशी आहेत. घोड्यांची संख्याही १६७१ इतकी आहे. त्याशिवाय ९ लाख शेळ्या, १४९०८ डुक्कर, १ लाख २५ हजार मेंढ्यांचाही त्यात समावेश आहे.

मोबाइल अॅपद्वारे सर्व्हेक्षण

प्रत्येकी घरी जाऊन मोबाइल अॅपद्वारे हे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी मोबाइल अॅपमध्ये प्राण्यांच्या २१९ प्रकाराच्या पशुधनाच्या जातींची गणना होणार आहे. प्रगणक स्वतःच्या मोबाइलमधील अॅपद्वारे गणना करतील.

प्राण्यांची वर्गवारी, जात, यासंदर्भातील छायाचित्रासह माहिती त्या अॅपमध्ये आहे. या सर्व्हेक्षणामध्ये गावातील पाळीव कुत्रे, भटक्या कुत्र्यांची मोजणी होणार आहे. त्याशिवाय दूधडेअरी, मटक आणि चिकन विक्रीच्या दुकानासह त्यांच्याकडील माहितीची नोंद होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जनतेने ८० वेळा नाकारलेले आज संसदेचे कामकाज बंद पाडतायतं' पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Inflation Control : वायदेबंदीमुळे महागाई नियंत्रणात बाधा?

Sharada Pawar : ‘लाडकी बहीण योजने’बाबत ‘मविआ’विरोधात खोटा प्रचार

Agriculture Commodity Market : तूर, हरभरा, कापसाच्या किमतीत घसरण

Cow milk Rate : गाय दूध खरेदी दरात ३ रुपयांची कपात, पश्चिम महाराष्ट्रातील दूध संघाचा निर्णय

SCROLL FOR NEXT