Kolhapur Kharip Season agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Kharip Season : कोल्हापूर जिल्ह्यात ३७ टक्के पेरण्या, दुष्काळी भागात पावसाचा दिलासा

Rain In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात रोहिणी नक्षत्रापासून पेरणीला सुरुवात झाली. आठवडाभर पावसाने दिलेल्या ओढीमुळे पेरण्या खोळंबल्या होत्या.

sandeep Shirguppe

Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यात वळीवाच्या पावसाने चांगली साथ दिल्याने शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर धुळवाफ पेरणीपासून पेरण्यांना चांगलाच वेगल आल्याचे पहायला मिळत आहे. काही तालुक्यात चांगला पाऊस झाला तर काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. असे असतानाही जिल्ह्यात आत्तापर्यंत ३७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक ७२ टक्के, तर सर्वात कमी म्हणजे ९. ४८ टक्के पेरण्या गगनबावडा तालुक्यात झाल्या आहेत.

जिल्ह्यात रोहिणी नक्षत्रापासून पेरणीला सुरुवात झाली. आठवडाभर पावसाने दिलेल्या ओढीमुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु कालपासून सुरू झालेल्या पावसाने शेतकरी पुन्हा पेरणीच्या कामांना गती देत असल्याचे ग्रामीण भागात पहायला मिळत आहे. आत्तापर्यंत ३७ टक्के भात पेरणी, ४५ टक्के मका पेरणी, २४ टक्के ज्वारीची पेरणीसह इतर नागली, तूर, मूग, भुईमूग, सुर्यफूलाची पेरणी झाली आहे. सोयाबीनची ५३ टक्के पेरणी झाली आहे.

राधानगरी धरण क्षेत्रात ६० मिलिमीटर पाऊस

राधानगरी तालुक्यात दमदार पावसाने सुरूवात केली आहे. दुपारी बारापासून चार पर्यंतच्या चार तासातच राधानगरी धरण क्षेत्रात ६० मिलिमीटर तर दाजीपूर परिसरात ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल काळम्मावाडी धरण क्षेत्रात २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर उद्यापासून तलावांमध्ये पाणलोट क्षेत्रातून पाणी येण्‍यास सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठी टीएमसीमध्ये

राधानगरी धरणात २.१९, तुळशी १.२८, वारणा १०.५०, दूधगंगा ३.२९, कासारी ०.७९, कडवी १.१७, कुंभी ०.९०, पाटगाव १.२८, चिकोत्रा ०.५०, चित्री ०.४९, जंगमहट्टी ०.४०, घटप्रभा ०.९१, जांबरे ०.३२, आंबेआहोळ ०.८८ व कोदे लघु प्रकल्प ०.०३ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

गडहिंग्लजला जोरदार एन्ट्री

गडहिंग्लज तालुक्यात आज दुपारी पावसाने जोरदार एन्ट्री केली. या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. सकाळपासून ऊन होते. दुपारी चारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले आणि पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी सात पर्यंत पाऊस कोसळला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT