Bidri Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Bidri Sugar Factory : ऊस दरात राज्यात बिद्री सहकारी साखर कारखाना लै भारी, दिला उच्चांकी दर

Sugarcane Rate Kolhapur : बिद्री साखर कारखान्याची सन २०२३ ते २८ या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली.

sandeep Shirguppe

Bidri Sugar Factory Kolhapur : बिद्री साखर कारखान्याची सन २०२३ ते २८ या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिद्री सहकारी साखर कारखान्यावर पुन्हा एकदा के.पी. पाटील गटाने आपली सत्ता अबाधित ठेवत वर्चस्व निर्माण केले. दरम्यान के. पी. पाटील यांनी विधानसभेच्या दृष्टीने आपली पावले टाकण्यास सुरुवात केली आहेत.

कारखान्यामध्ये नुतन संचालकांचा प्रवेश आणि अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड आज करण्यात आली यामध्ये के. पी. पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. दरम्यान के. पाटील यांनी अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारताच जिल्ह्यात उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

कारखान्याकडून ऊस उत्पादकांना टनाला ३ हजार ४०७ रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान बिद्री साखर कारखाना राज्यातील उच्चांकी दर देणारा कारखाना ठरला आहे.

कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांची बैठक आज सकाळी दहा वाजता कारखाना प्रधान कार्यालयात बोलावण्यात आली होती. यावेळी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार के. पी. पाटील यांची निवड निश्चित करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया करण्यात आली.

बिद्री’ साखर कारखान्याची आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक दराची परंपरा आहे. मागील हंगामात १२.६२ टक्के साखर उताऱ्याला प्रतिटन ३२०९ रुपये दर दिला होता. मागील हंगामात ८ लाख ८० हजार टनाचे गाळप पूर्ण झाले होते.

यावर्षी ‘स्वाभिमानी’ने ऊस दराचे आंदोलन सुरु केले, पण कारखान्याची निवडणूक असल्याने त्यांना दर जाहीर करता आला नव्हता. परंतु के पी पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना शब्द दिल्याप्रमाणे उच्चांकी दर दिला आहे.

बिद्रीच्या निवडणुकीत जाहीरनाम्यात दिल्याप्रमाणे सभासदांना अपेक्षेपेक्षा जादा दर देण्याचा शब्द कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी दिला होता. तो खरा ठरल्याची चर्चा तीन तालुक्यात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT