Fruit Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : फळपीक विम्याचे३४ हजार शेतकऱ्यांना ७० कोटी मिळणार

Crop Insurance Scheme : विमा परतावा मिळावा यासाठी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय, पक्ष शेतकरी संघटनाची आंदोलने सुरू होती.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यातील ३४ हजार आंबा, काजू बागायतदारांना फळपीक विम्यापोटी ७० कोटी रुपये मिळणार आहेत. येत्या एक-दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. विमा परतावा मिळावा यासाठी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय, पक्ष शेतकरी संघटनाची आंदोलने सुरू होती.

हवामानावर आधारीत फळपीक योजनेत जिल्ह्यातील ३९ हजार ३६९ शेतकऱ्यांनी लागवडीखालील क्षेत्र संरक्षित केले होते. शेतकऱ्यांनी ११ कोटी २७ लाख रुपये रक्कम विमा कंपनीकडे भराणा केली होती. गेल्या वर्षीच्या हंगामात ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, तापमान वाढ अशा विविध नैसर्गिक संकटामुळे फळपिकांचे नुकसान झाले होते.

१५ मे हा जोखीम कालावधी होता. या जोखीम कालावधीनंतर ४५ दिवसांनंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणे आवश्यक होती. परंतु ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे ठाकरे गट, वेंगुर्ले बागायतदार संघ, सावंतवाडीतील आंबा, काजू बागायतदार यांच्यासह विविध भागातील शेतकरी संघटनानी विमा परतावा मिळावा यासाठी उपोषण, आंदोलने केले.

ठाकरे गटाने १ नोव्हेंबरला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी जिल्हा कृषी अधीक्षक विजय राऊत यांनी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विमा परतावा शेतकऱ्यांना मिळेल.

त्यासंदर्भातील प्रकिया आयुक्त कार्यालयात सुरू असल्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, आता ३४ हजार शेतकऱ्यांसाठी ७० कोटी विमा परतावा मिळणार हे निश्चित झाले असून येत्या दोन दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

फळपीक विम्यावरून श्रेयवाद

फळपीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यापूर्वी राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादावरून जुंपली आहे. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि सतिश सावंत यांनी आम्ही केलेले आंदोलन आणि सतत पाठपुरावा यामुळे ही भरपाई मिळाली आहे. तर भाजपाचे प्रभाकर सावंत यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यामुळेच ही रक्कम मिळाल्याचा दावा केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT