Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Neera Water Level: नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये ३४ टक्के पाणीसाठा

Dam Storage: पुणे जिल्ह्यातील नीरा खोऱ्यातील भाटघर, वीर, गुंजवणी व नीरा देवघर या चारही धरणांमध्ये सरासरी ३४.६४ टक्के पाणीसाठा असून, तो मागील वर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी अधिक आहे.

Team Agrowon

Pune News: उन्हाच्या झळा तीव्र होत असताना पाण्याची मागणी वाढली आहे. परंतु नीरा खोऱ्यातील चार धरणांत बुधवारअखेर (ता. १६) गतवर्षी पेक्षा सरासरी १० टक्क्यांनी पाणीसाठा अधिक असल्याचे पाटबंधारे दिलेल्या माहितीमधून दिसून येत आहे. या मुबलक पाणीसाठ्यामुळे सिंचन क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

नीरा खोऱ्यांत असलेल्या नीरा-देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण पाणलोट क्षेत्रांत जून २०२४ मध्ये पाऊस लवकर पडला. या हंगामात धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला. तर परतीच्या पावसानेही दमदार हजेरी लावली. त्यामुळे नीरा खोऱ्यातील चारही धरणे १०० टक्के भरून दोन आठवडाभर वाहिली. नीरा खोऱ्यातील चारही धरणांत मिळून ३४.६४ टक्के पाणीसाठा बुधवारी (ता. १६) उपलब्ध होता.

मागील वर्षी आजच्या दिवशी तो २५.०२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होते. वीर धरणात सध्या ५९.३ टक्के पाणीसाठा आहे. वीर धरणाच्या दोन्ही कालव्यांतून मुबलक प्रमाणात सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जात आहे. नीरा डाव्या कालव्यातून ८२७, उजव्या कालव्यातून १,५५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जून महिन्यापर्यंत कालव्यातून आवर्तन सुरू राहील अशी आशा आहे. वीर धरणाच्या नीरा डाव्या कालव्यामधून आतापर्यंत ९.६८ तर उजव्या कालव्यातून १६.६५ टीएमसी पाणी वापर करण्यात आला आहे.

या वर्षी नीरा खोऱ्यातील भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी व वीर ही धरणे १०० टक्वर भरली होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला असला तरी या वर्षी उन्हाळा देखील कडक आहे. आगामी महिन्यांमध्ये तर उष्णतेच्या लाटा येणार असल्याचे हवामान विभागाकडून कळविण्यात येत आहेत.

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणात मुबलक पाणीसाठा निर्माण झाला होता, त्यामुळे शेती सिंचनाला पाणी मिळणारअसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली. तर रब्बीतील गहू, ज्वारी, हरभरा व उन्हाळी सोयाबीन लागवड देखील शेतकऱ्यांना करता आली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT