Loksabha Election Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Mill Election : 'यशवंत'च्या निवडणुकीत ३२० उमेदवार मैदानात

Cooperative Sugar Mill : पूर्व हवेलीतील थेऊर (ता. हवेली) येथील बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या ९ मार्च रोजी होणार आहे.

Team Agrowon

Pune News : पूर्व हवेलीतील थेऊर (ता. हवेली) येथील बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या ९ मार्च रोजी होणार आहे. १० मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. १३ ते २७ फेब्रुवारी या कालावधित उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. २१ जागांसाठी तब्बल ३२० उमेदवारांनी आपले निवडणूक अर्ज दाखल केले आहेत.

या कारखान्याची तब्बल बारा वर्षानंतर ही निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून उपनिबंधक सहकार संस्था, पुणे शहर डॉ. शीतल पाटील या काम पाहणार आहेत. पूर्व हवेलीतील प्रत्येक गावातील इच्छुक राजकीय नेते मंडळी आपली प्रतिष्ठा पणाला लावून या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

तर, गावागावांतील सरपंचांनीदेखील उमेदवारी अर्ज भरण्याची संधी सोडलेली नाही. लोणी काळभोर गावात सर्वात जास्त १८८७ मतदार असून, सर्वात कमी प्रत्येकी १ मतदार मोशी, हिंगणे बुद्रुक, कोंढवे बुद्रुक या तीन गावांत आहेत. सध्या सभासद मतदारांचा आकडा अंदाजे चौदा ते पंधरा हजाराच्या आसपास आहे.

यशवंत कारखान्याच्या निवडणुकीत पूर्व हवेलीतील के. डी. कांचन, राजेंद्र टिळेकर, पांडुरंग काळे, सुभाष जगताप, प्रकाश जगताप, महादेव कांचन, राजाराम कांचन, प्रशांत काळभोर, संचालक अप्पासाहेब काळभोर, माणिक गोते, हिरामण काकडे, राजेंद्र ज्ञानोबा, युवराज कांचन, सुनील कांचन, भाऊसाहेब कांचन, किरण काळभोर, भारती शेवाळे, छाया काकडे, वंदना काळभोर, राजश्री काळभोर आदी दिग्गज राजकीय नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

दरम्यान, गतवर्षी पांडुरंग काळे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या निवडणुकीसाठी शेतकरी सभासदांनी ३० लाख रुपयांचा निधी जमा केला होता. तो साखर आयुक्त गायकवाड यांच्या उपस्थितीत कारखान्याच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष आणि पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक संजय गोंदे यांच्याकडे शेतकरी सभासदांनी सुपूर्त केला होता.

गटनिहाय जागा व दाखल उमेदवारी अर्ज

गट..............................जाग....दाखल अर्ज संख्या

विमुक्त जाती/ भटक्या जमाती- १...... १७

इतर मागास वर्ग- १....२६

अनुसूचित जाती/जमाती- १.... ११

महिला राखीव- २..... २९

उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था- १....१५

सर्वसाधारण गट १- ३.....३२

सर्वसाधारण गट २- ३.....४६

सर्वसाधारण गट ३-३ .....४१

सर्वसाधारण गट ४- २....२७

सर्वसाधारण गट ५- २....३८

सर्वसाधारण गट ६- २....३८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT