Revenue Department Agrowon
ॲग्रो विशेष

Revenue Department : मंगळवेढा महसूल विभागात विविध जागांची ३१ पदे रिक्त

Revenue Department Mangalvedha : मंगळवेढा महसूल विभागात वेगवेगळ्या पदांवरील ३१ कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत.

Team Agrowon

Solapur News : मंगळवेढा महसूल विभागात वेगवेगळ्या पदांवरील ३१ कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्याच्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवर नागरिकांना सेवा देताना ताण जाणवत आहे.

तहसीलदार हा तालुका महसूल प्रशासन व्यवस्थेचा केंद्रबिंदू असतो. महसूल विभागात जमिनीशी संबंधित कामे, करसंबंधित कामे, समस्यांचे निवारण, नैसर्गिक आपत्तीशी संबंधित नुकसान, दस्तऐवज संबंधित कामे, भूसंपादन प्रकरणे आदी विविध प्रकारची कामे असतात.

महसूल विभागातील रिक्त पदांमुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. एका कामासाठी दहा हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. तालुक्याच्या शेती चक्राचा बोजा वाहणाऱ्या महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांची भरती लवकरात लवकर व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

तलाठ्यांच्या रिक्त जागा अधिक

मंगळवेढा महसूल विभागात ८१ गावे आहेत. या ८१ गावांसाठी तलाठ्यांच्या ४६ जागा मंजूर आहेत. त्यापैकी ३३ जागांवर तलाठी आहेत तर १३ जागांवर पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे,

दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन व जनता यांमधील दुव्याचे काम करणे या कामांसह शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश किंवा सूचना देत असते.

नैसर्गिक आपत्तीची माहिती मंडल अधिकारी व तहसीलदारास देणे, गावातील जमिनींचा आणि पिकांचा हिशेब ठेवणारा हिशेबनीस म्हणून तलाठ्याकडे पाहिले जाते. गावातील इंचन्इंच जमिनीच्या तसेच जलस्रोतांच्या नोंदी ठेवणे हे तलाठीपदाचे मुख्य काम आहे.

पण तलाठी पदांच्या अपुऱ्या संख्येमुळे कामावर असणाऱ्या तलाठ्यांवर त्या अतिरिक्त कामांचा ताण येतोय व त्याचा परिणाम कामावर दिसून येत आहे.

अशा आहेत रिक्त जागा

नायब तहसीलदार : एक, अकाउंटंट : एक, महसूल सहायक : सहा, तलाठी : १३, वाहनचालक : एक, शिपाई : पाच, कोतवाल : चार अशा एकूण १३० मंजूर पदांपैकी ३१ कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया अपुरी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

SCROLL FOR NEXT