Solapur ZP Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur ZP : सोलापूर जिल्हा परिषदेत ३१ लिपिकांना समुपदेशनाने पदोन्नती

Clerk Promotion : सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात शुक्रवारी (ता. २१) समुपदेशनाने लिपिक वर्गातील ३१ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात शुक्रवारी (ता. २१) समुपदेशनाने लिपिक वर्गातील ३१ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. पदोन्नतीत पात्र २८ जणांसह स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण तीन कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत पदोन्नती पात्र दोन सहायक प्रशासन अधिकाऱ्यांना वरिष्ठ सहायक प्रशासन अधिकारी, सहा वरिष्ठ सहायकांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी तर २० कनिष्ठ सहायक प्रशासन अधिकाऱ्यांना वरिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. शुक्रवारी सामान्य प्रशासन विभागातील पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली.

उर्वरित सात विभागांचे २८ पर्यंत समुपदेशन

महिला व बालकल्याण विभाग वगळता बांधकाम, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत, लेखा या सहा विभागातील पदोन्नती प्रक्रियाही समुपदेशनाने राबविण्यात येणार आहे. त्या विभागांकडून लवकरच माहिती प्राप्त होणार आहे. त्यानंतर २८ फेब्रुवारीपर्यंत समुपदेशनाने पदोन्नती देण्यात येणार असल्याचे प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगितले.

यांना मिळाली पदोन्नती

सहाय्यक प्रशासन अधिकारी ः सूर्यकांत मोहिते, सिद्धराम बोरुटे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ः सचिन येडसे , तात्या कांबळे, संजय गिराम. एम. टी. राठोड, पी. पी. जाधव, श्रीकांत जोशी,

वरिष्ठ सहाय्यक ः विजय शेलार , समीर कुंभार, जयश्री सरवदे, संजय कांबळे, वंदना जाधव, चंद्रकांत जगताप, श्यामल अडाकुल, इरफान कारंजे, संजय बाणूर, सुग्रीव सुर्वे, सुनीता भुसारे, विजयकुमार शिंदे, दीपक माने, विकास म्हेत्रे, राहुल सोरटे, सुंदर नागटिळक, नागेश भालेराव, संतोष सातपुते, प्रवीणकुमार पवार, मायादेवी शिंदे, दीपक वाघमारे, कुंडलिक खुर्द, रेणुका प्रथमशेट्टी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT