Jalna Market Committee Election Agrowon
ॲग्रो विशेष

Jalna Market Committee Election : जालना बाजार समिती निवडणुकीतून ३०८ जणांची माघार

Team Agrowon

Jalna News : जालना जिल्ह्यातील पाच बाजार समितीच्या (Jalna Market Committee Election) होत असलेल्या निवडणुकीसाठी विविध मतदार संघांतून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या ५११ उमेदवारांपैकी ३०८ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता २०३ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत.

जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, आष्टी, परतूर, मंठा या पाच बाजार समित्यांसाठी निवडणूक होते आहे.

सहकारी संस्था मतदार संघातील सर्वसाधारण, महिला राखीव, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, तसेच ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण, अनुसूचित जाती/ जमाती, आर्थिक दुर्बल घटक याशिवाय व्यापारी मतदारसंघ, हमालमापाडी मतदार संघातून प्रतिनिधी निवडण्यासाठी ही निवडणूक होते आहे.

पाचही बाजार समितीतून विविध मतदार संघांसाठी दाखल झालेल्या अर्जापैकी ५११ उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आले होते. २० एप्रिलला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या मुदतीत ३०८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने २०३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहेत.

बाजार समिती सहकारी संस्था अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातून प्रतिनिधी निवडण्यासाठी ७३ महिला राखीवमधून प्रतिनिधी निवडण्यासाठी २१ इतर मागास वर्गातून ९ विमुक्त जाती भटक्या जमातीमधून ११ असे एकूण ११४ अर्ज आहेत.

ग्रामपंचायत मतदार संघ अंतर्गत सर्वसाधारण जागेसाठी २९ अनुसूचित जाती जमाती १० आर्थिक दुर्बल घटकासाठी १० असे एकूण ४९ अर्ज आहेत, तर व्यापारी मतदार संघातून २२ व हमाल मापाडी मतदार संघातून १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

बाजार समितीनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या

अंबड - ४५

घनसावंगी - ३७

आष्टी - ३६

परतूर - २३

मंठा - ६२

बाजार समितीनिहाय रिंगणातून माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या

अंबड - ५१

घनसावंगी- ६०

आष्टी - ४८

परतूर - ४०

मंठा - १०९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT