Backward Class Corporation  Agrowon
ॲग्रो विशेष

MPBCDC : मागासवर्गीय महामंडळांना केंद्राचा ३०५ कोटींचा निधी

Funding Approved : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने ३०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

Team Agrowon

Pune News : राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली महात्मा फुले विकास महामंडळ, लोकशाही अण्णा भाऊ साठे महामंडळ, चर्मकार विकास महामंडळ मागासवर्गीय समाजासाठी कार्यरत आहेत. या महामंडळांसाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने ३०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या निधीचा वापर चार जिल्ह्यांत सीएफसी आणि कृषी प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या सूत्रांनी दिली. राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाने केंद्र शासनास या बाबतचा कृती आराखड्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, महात्मा फुले विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव प्रशांत वाघ, महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम, आयटी तंत्रज्ञ विशाल पगारे यांनी आराखडा तयार केला होता. पंतप्रधान अनुसूचित जाती अभ्युद्य योजनेद्वारे हा निधी मंजूर केला आहे.

महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाद्वारे रत्नागिरी, नागपूर, नाशिक व जळगाव या जिल्ह्यांत ही सेंटर उभारण्यात येतील. कृषी प्रक्रिया युनिटद्वारे या जिल्ह्यांतील अनुसूचित जातीच्या शेतकरी कंपन्या व त्या परिसरातील किमान १०० किलोमीटर क्षेत्रातील मागासवर्गीय लोकांना याचा उपयोग होईल. ही केंद्रे कृषिप्रक्रिया, शीतगृहे, पॅकेजिंग आणि बॅकवर्ड-फॉरवर्ड लिंकेज यांसारख्या अत्यावश्यक सुविधा पुरवतील.

कॉमन फॅसिलिटी सेंटर्स (सीएफसी) बरोबरच मागासवर्गीय समाजातील युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण योजनादेखील राबविण्यात येतील. त्यासाठी ११० कोटी रुपयांचा निधी, तर पायाभूत सुविधांसाठी ९० कोटींची तरतूद आराखड्यात करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT