Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Palandur Crop Damage : पालांदूर परिसरात ३०० हेक्‍टर पीक बाधित

Hailstorm Update : संततधार पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे पालांदूर परिसरात ३०० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्राथमिक अहवालात वर्तविण्यात आला आहे.

Team Agrowon

Rain Update In Bhandara : संततधार पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे पालांदूर परिसरात ३०० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्राथमिक अहवालात वर्तविण्यात आला आहे. त्यासोबतच १६३ घरांची पडझड झाली आहे.

लाखनी तालुक्‍यातील पालांदूर व परिसरातील बऱ्याच गावात मंगळवारी (ता. २) सायंकाळी बऱ्याच गावात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली. वादळामुळे अनेकांच्या घरावरील छत उडाले. परिणामी, त्यांच्यावर निर्वासित होण्याची वेळ आली.

धानाचे पीक जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले. या भागात भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना देखील याचा फटका बसत उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील शक्‍य झाली नाही.

अवकाळी पावसाच्या दणक्‍यात १३९ कोंबड्यांचा मृत्यू झाला. यात कुक्‍कुटपालक संजय हजारे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह तहसीलदार महेश शितोळे, कृषी सहाय्यक यांनी नुकसानग्रस्त भागात जात पाहणी केली.

प्रशासनाने सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ग्रामपंचायत कार्यालयात यादी लावावी. ज्यांची नावे सुटतील त्यांचे सरपंच, सदस्य यांच्या सहकार्याने तलाठी, कृषी विभाग व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून पुन्हा सर्व्हेक्षण करून नाव नोंदवावे. या संदर्भात राज्यपाल, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

ZP Panchayat Samiti Election : कार्यकर्त्यांना संधी मिळणार! जिल्हा परिषदेत ५ आणि पंचायत समितीमध्ये २ स्वीकृत सदस्य नेमणार?

Agriculture Department Land : तासगावातील ‘कृषी’ची जागा द्राक्ष संघास भाडे कराराने द्यावी

Aaple Sarkar Center : सोलापूर जिल्ह्यातील महसूल मंडल कार्यालयास मिळणार ‘आपले सरकार केंद्र’

Agriculture Irrigation : शेतशिवारात उष्णतेमुळे सिंचनाची लगबग

Rabi Season : रब्बी पेरणीची पूर्वमशागत वेगात

SCROLL FOR NEXT