Fodder Fire Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Fire : शॉर्टसर्किटमुळे तीस ट्रॉली चारा जाळून खाक

Animal Fodder : वीज वितरण कंपनीच्या लोंबकळणाऱ्या तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्याने लागलेल्या आगीत शेतकऱ्याचा तब्बल पंचवीस ते तीस ट्रॉली चारा जळून खाक झाला.

Team Agrowon

Nashik News : वीज वितरण कंपनीच्या लोंबकळणाऱ्या तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्याने लागलेल्या आगीत शेतकऱ्याचा तब्बल पंचवीस ते तीस ट्रॉली चारा जळून खाक झाला. दरम्यान चाऱ्याला लागलेली आग डाळिंब बागेत गेल्याने डाळिंब बागेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे वीज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.

वायगाव (ता. सटाणा) येथील शेतकरी दिलीप कडू अहिरे यांची (गट क्र.२५) मध्ये शेत जमीन आहे. जनावरांसाठी त्यांनी शेतात पंचवीस ते तीस ट्रॉली चारा घेऊन गंजी घातली होती.

शनिवारी (ता. १८) सायंकाळी चारच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या लोंबकळणाऱ्या तारांच्या शॉर्टसर्किटमुळे गंजी घातलेल्या चाऱ्यावर ठिणगी पडली आणि बघता बघता आगीचे रौद्र रूप तयार झाले. गंजी घालून ठेवलेल्या चाऱ्याला आग लागल्याची शेतकऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली.

आरडाओरड ऐकून स्थानिक शेतकरी मदतीला धावून आले व आग विझविण्यासाठी पाण्याचे टँकरने प्रयत्न केला; मात्र संपूर्ण चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने चारा पूर्णपणे खाक झाला.

दरम्यान जवळच असलेल्या डाळिंब बागेत आगीचे लोळ शिरल्याने ठिबक संच, पाइप तसेच डाळिंब बागेतील झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक वायरमनने पाहणी केली असता वरिष्ठ अधिकारी येऊन पाहणी करतील, असे सांगण्यात आले.

तलाठी कल्पेश साळुंखे व ग्रामसेवक पंडित बोरसे यांनी पंचनामा केला. या परिसरात वीज वितरणाच्या लोंबकळत असलेल्या तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची ही दुसरी घटना असून परिसरातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT