Lemon Rate Hike Agrowon
ॲग्रो विशेष

Lemon Market : बारामतीत लिंबू प्रतिकिलो ३० ते ७६ रुपये

Lemon Production : सर्वच शेतकरी लिंबाच्या मालाची प्रतवारी करत नाहीत. त्यामुळे दर कमी मिळतो.

Team Agrowon

Baramati News : येथील बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात बुधवारी (ता. १४) ४९ क्विंटल लिंबाची आवक झाली. लिलावात लिंबाला एका किलोला कमाल ३० ते किमान ७६ रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

पूर्ण पिवळ्या व कच्च्या हिरव्या रंगाच्या लिंबाला बाजारभाव कमी आहे. मध्यम पक्व (गाभुळलेल्या) स्थितीतील लिंबाला शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळत असल्याची माहिती आडतदार दीपक हिरवे, गुलाबभाई बागवान यांनी दिली.

सर्वच शेतकरी लिंबाच्या मालाची प्रतवारी करत नाहीत. त्यामुळे दर कमी मिळतो. प्रतवारी केलेल्या लिंबाला चांगला दर मिळतो, अशीही माहिती त्यांनी दिली.

शेतकरी काळूराम गायकवाड म्हणाले, की दर आठवड्याला हंगामात १२० झाडांपासून सरासरी १०० किलो लिंबाचा माल निघतो. बाजारात ११७ किलोचे ५ डाग विक्रीसाठी आले. त्याला किलोला ६५ रुपयांचा बाजारभाव मिळाला. बाबासाहेब हिरवे म्हणाले, की लिंबांची ५० झाडे आहेत. आज ७० किलोचे ३ डाग निघाले. त्याला ६७ रुपयांचा बाजारभाव मिळाला.

चिंचेचा लिलाव पुढील शनिवारपासून सुरू

सुप्यात दरवर्षी चिंचेची मोठी आवक होते. बाहेरील राज्यातून चिंच खरेदीसाठी व्यापारी येतात. चिंचेचा हंगाम सुरू होत असल्याने या वेळी शनिवारपासून (ता. २४) चिंचेचे लिलाव सुरू होणार असल्याची माहिती सचिव जगताप व दत्तात्रेय जमदाडे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT