Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : सांगलीत रब्बीचा पेरा ३० टक्के

Rabi Season : आतापर्यंत ३० टक्के पेरा झाला आहे. ज्वारीची सर्वाधिक पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात सप्टेंबरच्या शेवटच्या चार दिवसांत सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन केले असून रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू झाली आहे. आतापर्यंत ३० टक्के पेरा झाला आहे. ज्वारीची सर्वाधिक पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९० हजार ९६१ हेक्टर इतके आहे. सध्या ५८ हजार ४३८ हेक्टरवर पेरा झाला आहे. यामध्ये ज्वारी आणि मका ही पिके आहेत. जिल्ह्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र १ लाख २६ हजार ६६ हेक्टर इतके आहे.

जत तालुक्यात सर्वाधिक सरासरी क्षेत्र ६३ हजार ९१९ हेक्टर आहे. जिल्ह्यात ५४ हजार ५५० हेक्टरवर अर्थात ४३ टक्के ज्वारीचा पेरा झाला आहे. मका पिकाचे पेरणीसाठी सरासरी क्षेत्र १८ हजार १५२ हेक्टर आहे. त्यापैकी २५ टक्के म्हणजे ३ हजार ७१८ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.

https://whatsapp.com/channel/0029Va6bBAMI1rckFSh9s61r

जिल्ह्यातील शेतकरी परतीच्या पावसाची प्रतीक्षा करत आहे. त्यामुळे पेरण्यांना गती नाही. ऑक्टोबरअखेर पेरण्यांना वेग येणार आहे. जिल्ह्यात आडसाली, खोडवा ऊस गाळपाला गेल्यानंतर शेतकरी गहू, हरभरा पिकांच्या पेरणीचे नियोजन केले जाते.

ज्वारीचा पेरा ४३ टक्के

दुष्काळी भागातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यात रब्बी ज्वारीची पेरणी केली जाते. यंदाच्या हंगामात या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीची पेरणी केली आहे. काही भागात पेरणी सुरू आहे. ज्वारीचे पीक उगवण ते रोपावस्थेत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT