Biodiversity Agrowon
ॲग्रो विशेष

Biodiversity : जैवविविधतेसाठी ३० टक्के भूभाग, जलसाठे संरक्षित

जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला किमान ३० टक्के भूभाग आणि जलसाठे २०३० पर्यंत पूर्णपणे संरक्षित करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या जैवविविधता परिषदेत (सीओपी-१५) घेण्यात आला आहे.

टीम ॲग्रोवन

मॉट्रिअल (वृत्तसंस्था) : जैवविविधतेच्या (Biodiversity) दृष्टीने महत्त्वाचा असलेला किमान ३० टक्के भूभाग (Land) आणि जलसाठे (Water Reservoir) २०३० पर्यंत पूर्णपणे संरक्षित करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या जैवविविधता परिषदेत ((United Nation Biodiversity Conference)) (सीओपी-१५) घेण्यात आला आहे. त्यामुळे सजीव सृष्टीसाठी महत्त्वाचे असणारे जगभरातील भूभाग आणि समुद्र जतन करण्याच्या प्रयत्नांना मोठे यश आले असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. या मुळे जैवविविधतेचे जतन व संवर्धनासाठी निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

कॅनडामध्ये सुरु असलेली जैवविविधता परिषद संपण्यास केवळ एक दिवस शिल्लक असताना सहभागी देशांनी निसर्गातील जैववैविध्य जपण्यासाठी तयार केलेल्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. चीनच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत पर्यावरण बचावाच्या मुद्द्यावर चांगली चर्चा झाली. जगभरात सध्या एकूण १७ टक्के भूभाग आणि १० टक्के समुद्र जैवविविधता जपण्यासाठी संरक्षित केलेला आहे.

हे प्रमाण २०३० पर्यंत ३० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट मंजूर मसुद्यात ठेवण्यात आले आहे. जगातील बहुतेक देशांनी एकत्र येऊन पर्यावरण संवर्धनासाठी अशा प्रकारचे मोठे उद्दीष्ट कधीही निश्‍चित केले नव्हते, अशी प्रतिक्रिया देत ‘कॅम्पेन फॉर नेचर’ या गटाचे संचालक ब्रायन ओ‘डॉनियल यांनी आनंद व्यक्त केला.

मोठा निधीही उभारणार

जैवविविधतेचे जतन करण्यासाठी २०३० या वर्षापर्यंत २०० अब्ज डॉलरचा निधी उभारण्याचे आवाहनही मसुद्यात करण्यात आले आहे. तसेच, विविध उत्पादनांवरील अंशदान बंद करून आणखी ५०० अब्ज डॉलर उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. गरीब देशांना पर्यावरणासाठी दिल्या जाणारा निधी दुप्पट करावा किंवा २०२५ पर्यंत त्यात दरवर्षी २० अब्ज डॉलरची भर घालावी, असेही आवाहन मसुद्यात करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT