Bhima Sugar Factory  Agrowon
ॲग्रो विशेष

Bhima Sugar Factory : ‘भीमा’च्या कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी धरणे आंदोलन

Workers Protest : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा मागील ३० महिन्यांपासून पगार झालेला नाही.

Team Agrowon

Solapur News : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा मागील ३० महिन्यांपासून पगार झालेला नाही. साखर कारखाना कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष दिलीप डोंगरे आणि सरचिटणीस हनुमंत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

फेब्रुवारी महिन्यात संघटनेच्या वतीने साखर कारखान्यासमोर आंदोलन केले होते. त्या वेळी प्रभारी कार्यकारी संचालक यांना कर्मचाऱ्यांनी थकित पगार आणि बाहेरील कंत्राटी कामगारांना कमी करून कायम कामगारांना कामावर घेण्याबाबत तसेच सर्व कामगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे २०१८ पासूनचे फायनल पेमेंट व पाच वर्षाचा प्रॉव्हिडंट फंड व ३० महिन्यांचा थकित पगार मिळाला नसल्याबाबत जाब विचारला होता.

याचप्रश्‍नी २०२३ आणि २०२४ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांसमोर थकित पगार व फंड तसेच फायनल पेमेंटबाबत बैठक होऊन २०२४ पर्यंत सर्व पगार व थकित पगार कर्मचाऱ्यांना देण्यासंदर्भात व्यवस्थापनाने लेखी स्वरूपात लिहून दिले होते. मात्र अद्यापही या कामगारांच्या मागण्यांना कारखाना प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही.

कामगारांना काही न देता बाहेर कंत्राटी कामगाराकडून कारखान्यातील कामे करून घेतली जात आहेत. कायम कामगारांना घरी बसून कंत्राटी कामगारांना काम देण्याला संघटनेचा विरोध असून, संघटनेच्या मागण्यांचा तातडीने विचार न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भीमा सहकारी साखर कारखाना कामगार संघटनेचे अध्यक्ष डोंगरे आणि सरचिटणीस चव्हाण यांनी दिला आहे.

या आंदोलनप्रसंगी रमेश काळे, संतोष भोसले, संजय चव्हाण, भारत पवार, सुरेश डोंगरे यांच्यासह भीमा साखर कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Forecast 2026: राज्यात यंदा कमी पाऊस; देशात सरासरीच्या ९२ टक्के पावसाचा अंदाज 

Tomato Care in Summer: टोमॅटो पिकावर उन्हाचा ताण! नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय करावे?

Fodder Shortage: नांदेडमध्ये चारा टंचाईचे सावट

Agriculture University Development: कृषी विद्यापीठाच्या बळकटीकरणात माजी विद्यार्थी संघटनेचे योगदान लागेल

Pineapple Prices Crash: अननसाचे भाव घसरले, उत्पादन खर्चही निघेना, केरळमधील शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT