Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Theft : शेतातील गोदामातून ३० पोते सोयाबीन लंपास

गेल्या वर्षीच्या हंगामात झालेल्या सोयाबीन उत्पादनपैकी ९० पोती सोयाबीन शेतातील घरात साठवण्यात आली होती.

Team Agrowon

Wardha Soybean Theft News : शेतात असलेल्या गोदाम (Warehouse) वजा घराचे कुलूप तोडून चोरट्याने त्यात साठवलेले ३० पोते सोयाबीन (Soybean Theft) चोरून नेले. चिस्तूर येथील अफजलपूर परिसरात ही घटना घडली.

चिस्तूर येथील रहिवासी विजयकुमार अत्रे यांची अफजलपूर शिवारात बारा एकर शेती आहे. ही शेती गेल्या वीस वर्षांपासून रामचंद्र गुणवंत शेळके हे करारावर करतात.

या शेतात शेतमाल साठवणुकीसाठी गोदाम वजा पक्के घर बांधण्यात आले आहे. त्याच्या दर्शनीय भागात चोरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविण्यात आले आहेत.

गेल्या वर्षीच्या हंगामात झालेल्या सोयाबीन उत्पादनपैकी (Soybean Producer) ९० पोती सोयाबीन शेतातील घरात साठवण्यात आली होती. अज्ञात चोरट्यांनी या गोदामात प्रवेश करत ३० पोती सोयाबीन मध्यरात्रीच्या सुमारास लंपास केले.

त्यासोबतच सीसीटीव्हीचा डीव्हीआरही पळविण्यात आला. यात शेतकऱ्याचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सोयाबीन चोरण्यासाठी चारचाकी मालवाहू वाहनाचा वापर करण्यात आल्याचे टायरच्या खुणांवरून स्पष्ट होते. यापूर्वी याच भागातून काही शेतकऱ्यांच्या शेतातून शेतीमाल तसेच स्प्रिंकलरचे पितळी नोझल चोरी केल्याचे प्रकार घडले होते.

त्याबाबत देखील शेतकऱ्यांनी तळेगाव पोलिसांत तक्रार नोंदवली होती. मात्र चोरट्यांचा सुगावा लावण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळेच निर्ढावलेल्या चोरट्यांनी ३० पोती सोयाबीन लंपास करण्यापर्यंत मजल गाठली अशी चर्चा आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

सध्या बाजारात सोयाबीनचे दर कमी असल्याने शेतकऱ्यांकडून सोयाबीनची साठेबाजी केली जात आहे. दर वाढताच सोयाबीन बाजारात आणून विकण्याचा शेतकऱ्यांचा मानस आहे. मात्र त्यापूर्वीच चोरट्यांकडून शेतमालाला टार्गेट केले जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळदीचे दर स्थिर; मोहरीचे दर टिकून, उडदाचा बाजार दबावात, गव्हाचे दर स्थिरावले, जिऱ्याचे भाव टिकून

Onion Subsidy: कांदा अनुदान योजना; सातबारावर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना २८ कोटींचे अनुदान

Banana Farming: केळी बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व पाणी व्यवस्थापन

Farmers Protest : ‘काळा’ पोळा करून सरकारला इशारा

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या आवकेत, विसर्गात वाढ

SCROLL FOR NEXT