Gram Panchayat Election Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Panchayat Election : छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रामपंचायत सदस्यपदासाठी २९४ उमेदवार मैदानात

Chhatrapati Sambhajinagar Local Body Election : १६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर २८ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या जिथे आवश्यकता असेल तिथे ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. सार्वत्रिक निवडणूक आणि पोटनिवडणूक मिळून सरपंचपदासाठी ४८ तर सदस्यपदासाठी २९४ उमेदवार असे ३४२ उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात आहेत.

माहितीनुसार १६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर २८ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या जिथे आवश्यकता असेल तिथे ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीतून सरपंचपदासाठी ४८ तर सदस्यपदासाठी २९४ उमेदवार आता रिंगणात शिल्लक राहिले आहेत.

जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या आणि २०२२ मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्याने निवडणुका होऊ शकल्या नाही अशा ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासह सरपंच पदाच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुका राजीनामा, अविश्वास ठराव यासह अन्य कारणांमुळे ग्राम पंचायतींच्या जागा रिक्त होत्या. त्यामुळे सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी येत्या ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, कन्नड, खुलताबाद आणि सोयगाव या तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. तर छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका होत आहेत.

सार्वत्रिक निवडणुकीच्या १६ सरपंच पदासाठी २० ऑक्टोबरपर्यंत ८३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. तर १२२ सदस्यपदासाठी ३५८ जणांनी अर्ज केले होते. यावेळी अर्ज छाननीत १० उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले होते.

त्यामुळे सरपंचपदासाठी ८२ जणांचे तर सदस्यपदासाठी ३४९ जणांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी बुधवारी (ता. २५) सरपंचपदासाठी ३६ आणि सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या १०१ जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता सरपंचपदासाठी ४४ तर सदस्यपदासाठी २४८ उमेदवार रिंगणात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT