Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : रब्बीच्या २९ टक्के पेरण्या

Rabi Season : दिवाळीनंतर पुणे जिल्ह्यात रब्बीच्या शेतीकामांना वेग येऊ लागला आहे. काही ठिकाणी ज्वारी, गहू, हरभरा पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : दिवाळीनंतर पुणे जिल्ह्यात रब्बीच्या शेतीकामांना वेग येऊ लागला आहे. काही ठिकाणी ज्वारी, गहू, हरभरा पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. तर ज्वारीच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. रब्बीचे एकूण दोन लाख २९ हजार ७१२ हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत ६६ हजार ८६० हेक्टर म्हणजेच सरासरी २९ टक्के पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

चालू वर्षी जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. भूजल पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात हवामान कोरडे झाले आहे. खरिपातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. त्यातच ऑक्टोबरमध्ये वाढलेल्या उन्हाच्या चटक्यामुळे जमिनीतील ओलावा काहीसा कमी झाला आहे.

परंतु परतीचा व मॉन्सूनोत्तर पाऊस झाल्याने काही ठिकामी शेतकरी अडचणीत आले आहेत. आता रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्यांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आर्थिक चणचण भासत असल्याने शेतकरी कर्ज काढून रब्बीची तयारी करू लागला आहे.

मागील काही दिवसांपासून थंडी वाढू लागल्याने रब्बी हंगामातील पेरणी करण्याच्या तयारीत शेतकरी आहे. चालू वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. यामध्ये ज्वारी व हरभरा पिकांच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे.

काही शेतकऱ्यांनी ज्वारी पिकांच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. तर काही ठिकाणी लवकर पेरणी केलेली ज्वारी उगवणीच्या व वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र, गहू व हरभरा पिकांच्या पेरण्यांना पोषक वातावरण असल्याने या पेरण्यांना सुरुवात होऊन पुढील एक ते सव्वा महिन्यात पेरण्या पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र

ज्वारी १,३४,३३६ ५४,८९५

गहू ३९,८०३ ४८८

मका १६,९४७ ८९७३

इतर रब्बी तृणधान्य २७१ ०

हरभरा ३४,३३० १६१४

इतर रब्बी कडधान्य ३८२९ ८१३

करडई २३ २९

तीळ ५ ०

जवस ११ १

सूर्यफूल ६६ ४४

इतर रब्बी गळीतधान्य ९१ ३

एकूण २,२९,७१२ ६६,८६०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT