Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : ‘मॉन्सूनोत्तर’ने बीडमध्ये २८६ हेक्टर पिकांचे नुकसान

Crop Damage Survey : महसूल व कृषी विभागाच्या पंचनाम्यांत तालुक्यात २८६.६ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचे नमूद असले तरी अधिक नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Team Agrowon

Beed News : मागील चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे तालुक्यात रब्बी व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाच्या पंचनाम्यांत तालुक्यात २८६.६ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचे नमूद असले तरी अधिक नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यात प्रामुख्याने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पात पिवळी पडली असून कांदाही सडला आहे. काही भागात महूसल व कृषी विभागाने पाहणीही केली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

आमच्या शेतातील कांदा मोठ्या प्रमाणावर नासला असतानाही नुकसान पाहणी झाली नसल्याचे तालुक्यातील मुळूकवाडी येथील कांचन ढास, सर्जेराव ढास म्हणाल्या. १,२०० लोकसंख्या असलेल्या मुळूकवाडी गावात ७५ टक्के शेतकरी कांद्याचे पीक घेतात. गावातील सगळा कांदा बंगळूर येथे विक्रीसाठी जातो.

एकरी ५० हजार रुपये कांद्याला खर्च केला असून तीन एकरांतील कांद्यातून तीन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आमच्या कष्टाची माती झालेली असताना अद्याप पाहणीच नाही तर भरपाई कधी मिळणार, असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, पीकविमा भरण्यासाठी ३० नोव्हेंबर शेवटची तारीख होती. ऑनलाइन पीकविमा भरणाऱ्यांचे धावपळ सुरू आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून वेबसाइट सुरळीत चालत नसल्याने व अतिशय संथ गतीने नेट चालत असल्याने दिलेल्या मुदतीमध्ये अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहिलेले आहेत, असे डॉ. गणेश ढवळे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT