Cotton Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton-Soybean Procurement : कापूस-सोयाबीन खरेदीपोटी शेतकऱ्यांना २८०० कोटी ; 'लाडकी बहीण'ही ठरतेय गेमचेंजर

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना जीवनमान सुधारण्यासह आत्मनिर्भर होण्यास मदत झाली आहे.

Mahesh Gaikwad

Pune News : कापूस-सोयाबीनच्या हमीभावाने केलेल्या खरेदीपोटी सरकारने शेकऱ्यांच्या खात्यात दोन हजार ८०० कोटी रुपये जमा केले आहे. राज्य सरकारच्या हमीभावाने शेतीमाल खेरदीचा राज्यातील ६८ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे, असे राज्यापाल सी.पी. राधाकृष्णन यांनी म्हटले आहे. मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानात आयोजित केलेल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

राज्यपाल म्हणाले की, २०२३ च्या खरीप हंगामासाठी ६८ लाखांहून अधिक कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २८०० कोटी रुपयांहून अधिक जमा करण्यात आली आहे. राज्य सरकारने हमीभावाने कापूस-सोयाबीनची खरेदी केल्यामुळे अनियमित पाऊस आणि खराब हवामान असूनही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळवता आल्याचेही ते म्हणाले.

लाडकी बहीण गेमचेंजर

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना जीवनमान सुधारण्यासह आत्मनिर्भर होण्यास मदत झाली आहे. या योजनेंतर्गत जुलै ते डिसेंबर २०२४ या कालावधित सुमारे २.४६ कोटी लाभार्थी महिलांना २१ हजार कोटींची आर्थिक मदत देण्यात आली. या आर्थिक मदतीमुळे महिला स्वयंरोजगाराकडे वाटचाल करत असून त्यांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे ते म्हणाले.

३८ प्रकल्पांवर काम सुरू

राज्यपाल म्हणाले की, पंप स्टोरेज प्रकल्प धोरणांतर्गत सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून ३८ प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यामुळे ५५ हजार ९७० मेगावॅट वीजेची निर्मिती होणार आहे.

तसेच २.९५ लाख रुपयांच्या गुंतवणूक आकर्षित करण्यास मदत होणार आहे. तसेच राज्य सरकारने पाण्याची उपलब्धता अधिक असलेल्या भागातील पाणी वळविण्यासाठी वैनगंगा-नळगंगा, दमणगंगा-गोदावरी यासह अनेक नद्यांना जोडणाऱ्या नदीजोड प्रकल्पांना मान्यता दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT