Illegal Seeds Seized  Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Seeds Seized : ‘अनधिकृत बियाण्यांचा २५ लाखांचा साठा जप्त’

Agriculture Department : कृषी विभागाने शुक्रवारी (ता. २४) एका वाहनातून १२.९० क्‍विंटल अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त केला.

Team Agrowon

Chandrapur News : कृषी विभागाने शुक्रवारी (ता. २४) एका वाहनातून १२.९० क्‍विंटल अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त केला. या बियाण्यांचे मूल्य २५.८० लाख रुपये आहे, असे नागपूर विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी सांगितले.

एका वाहनातून अनधिकृत बियाण्यांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिस व कृषी विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी गोंडपिपरी (चंद्रपूर) येथे सापळा लावला. या वेळी वाहन (एमएच ३४ एम-८६३५) थांबवीत वाहनाची झडती घेण्यात आली.

या वेळी वाहनात तब्बल १२.९० क्‍विंटल बियाणे अवैधपणे मिळाले. कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत, उपविभागीय कृषी अधिकारी गिरीश कुळकर्णी, उपसंचालक चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, रमेश हत्तीगोटे, लंकेश कटरे, श्रावण बोढे, महेंद्र डाखरे, विवेक उमरे यांनी ही कारवाई केली.

नागपूर विभागात मोहीम

नागपूर विभागात कृषी विभागाने अनधिकृत बियाण्यांविरोधात मोहीम उघडली आहे. या माध्यमातून आतापर्यंत एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचे बियाणे कारवाईत जप्त करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT