Solapur DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur DCC Bank : तत्कालीन संचालकांकडून २३८ कोटींची वसुली

Co-Operative Bank : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक नुकसानीला जबाबदार धरुन बँकेच्या तत्कालीन ३२ संचालकांसह इतर तीन अधिकाऱ्यांवर २३८ कोटी ४३ लाख ९९९ रुपयांची वसुली निश्चित कऱण्यात आली आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक नुकसानीला जबाबदार धरुन बँकेच्या तत्कालीन ३२ संचालकांसह इतर तीन अधिकाऱ्यांवर २३८ कोटी ४३ लाख ९९९ रुपयांची वसुली निश्चित कऱण्यात आली आहे.

चौकशी अधिकाऱ्यांच्या अहवालावर पुणे विभागीय सहकारी संस्थांचे सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत आवश्यक असणारा वसुलीचा लेखी दाखला दिला आहे. सुमारे १२ टक्के व्याजदराने ही रक्कम आता वसूल करण्यात येणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तत्कालीन संचालकांनी एकमेकांच्या साखर कारखाने, शिक्षण संस्था व अन्य उद्योग प्रकल्पांना कर्जे दिली, पण ती पुढे वसूलच झाली नाहीत. ही कर्जे अनुत्पादित (एनपीए) निघाल्यामुळे बँकेला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यामुळे २०१८ साली चौकशीअंती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती झाली होती. सहा वर्षांच्या चौकशीसह मुंबई उच्च न्यायालयातही हे प्रकरण पोचले होते.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक नुकसान प्रकरणाची चौकशी सहकार विभागाचे निवृत्त अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी करून मागच्या महिन्यात ८ नोव्हेंबरला नुकसानीची जबाबदारी निश्चित करणाऱ्या अहवाल त्यांनी विभागीय सहनिबंधक सुर्वे यांना दिला होता.

त्यात बँकेच्या तत्कालीन ३२ संचालकांसह अन्य तीन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली होती. नुकसानीची एकूण रक्कम २३८ कोटी ४३ लाख ९९९ रुपये एवढी असून शिवाय त्यावरील मागील दहा ते बारा वर्षांपासूनच्या व्याज आकारणी समाविष्ट आहे. सुमारे १२ टक्के व्याजाने ही वसुली होणार आहे. त्यामुळे ही रक्कम एक हजार कोटीच्या घरात जाणार आहे.

या दिग्गज नेत्यांकडून होणार वसुली

ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, बार्शीचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार दिलीप सोपल, भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील (वारसदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील), एसटी महामंडळाचे दिवंगत माजी अध्यक्ष सुधाकर परिचारक (वारसदार प्रभाकर परिचारक) शेकापचे दिवंगत माजी आमदार एस. एम. पाटील (वारसदार सुरेश पाटील आणि अनिल पाटील), माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे, त्यांचे बंधू माजी आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे,

माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार जयवंत जगताप, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, चांगोजीराव देशमुख (वारसदार-पांडुरंग देशमुख), सुरेश हसापुरे, अरुण कापसे, बबनराव अवताडे, संजय कांबळे, भैरू वाघमारे, रामदास हाक्के, सुनंदा बाबर, नलिनी चंदेले, राजशेखर शिवदारे, दिवंगत रामचंद्र वाघमोडे (वारसदार प्रकाश वाघमोडे व संजय वाघमोडे),

दिवंगत चांगदेव शंकर अभिवंत (वारसदार कमल अभिवंत, सुधाकर अभिवंत व सुनील अभिवंत), रश्मी बागल, विद्या बाबर, सुरेखा ताटे व सुनीता बागल या तत्कालीन संचालकांसह बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक किसन मोटे, काशिनाथ पाटील आणि सनदी लेखापाल संजीव कोठाडिया यांनाही नुकसान भरपाई वसुलीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. साधारण २३८ कोटी रुपयांची वसुली निश्चित झाली आहे, याशिवाय नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी राबविलेल्या प्रक्रियेचा ११ लाख २५ हजार रुपयांचा खर्चही यांच्याकडूनच वसूल केला जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmers Support: कांद्याच्या भावात घसरण, उपाययोजनांसाठी सरकारकडून समिती गठित

Crop Damage Nashik: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींच्या निधीचा प्रस्ताव

Fertilizer Overprising: सोलापूर जिल्ह्यातील १९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

Assembly Elections 2026: पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी ९१.४६ टक्के, तामिळनाडूत ८४.४१ टक्के मतदान

Crop Insurance Hingoli: हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचा ९८ कोटी ७० लाख रुपये पिकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT