Sugarcane Conference agrowon
ॲग्रो विशेष

Swabhimani Uus Parishad: 'स्वाभिमानी'ची ऊस परिषद उद्या; कारखानदारांसह शेतकऱ्यांना राजू शेट्टींच्या निर्णयाची प्रतिक्षा

Us Parishad Raju Shetti : ऊस परिषदेस महाराष्ट्र, कर्नाटकातून हजारो शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

sandeep Shirguppe

Raju Shetti News : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उद्या मंगळवारी (ता. 0७) जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर २२ वी ऊस परिषद होणार आहे. परिषदेची जय्यत तयारी सुरू असून या ऊस परिषदेस महाराष्ट्र, कर्नाटकातून हजारो शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती, माजी जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

यावेळी मादनाईक म्हणाले, 'मागील हंगामातील चारशे रूपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नाही. जिल्ह्यात काही ठिकाणे वगळता सर्वत्र उसतोडी बंद आहेत. जिल्ह्यातील काही साखर कारखाने पगारी बाउन्सर घेऊन उसाची वाहतूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा प्रकार केल्यास त्यांनाच चोप देण्यात येईल.

आम्ही घामाचे पैसे मागत आहोत. आमच्या उसातला पैसा वापरून आमच्यावरच गुंड सोडत असाल तर आम्ही कुणालाही सोडणार नाही. उसाचे क्षेत्र घटले आहे. शेतकरी अद्यापही शांत आहे. तातडीने दराचा प्रश्न निकाली लावावा, अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल.

१७ ऑक्टोबरपासून सुरू झालेली ही पदयात्रा विक्रमसिंह मैदानावर संपणार आहे. ऊस परिषदेमध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

ते म्हणाले, 'वाहनधारकांनीही सबुरीने घ्यावे. त्यांचे बुडालेले पैसे काढून देण्यासाठी आम्हीच पुढाकार घेतलेला आहे. परिषदेच्या ठिकाणी स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सिध्देश्वर मंदिर, दसरा चौक, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर आदी ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.' पत्रकार परिषदेस डॉ. महावीर अक्कोळे, विठ्ठल मोरे, आण्णासो चौगुले, शैलेश आडके, सागर संभूशेटे आदींसह कार्यकतें उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT