Sugar Production Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : देशात आतापर्यंत २२३ लाख टन साखर उत्पादन ; २६ कारखान्यांचे गाळप बंद

Sugar Production : राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. देशातही सध्या उसाचे गाळप वेगाने सुरू आहे.

Team Agrowon

Sugarcane Season 2023-24 : राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. देशातही सध्या उसाचे गाळप वेगाने सुरू आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात मात्र घट झाल्याने चित्र आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या आकडेवारीनुसार, १५ फेब्रूवारीपर्यंत देशातील ५०७ कारखान्यांमध्ये अद्यापही गाळप सुरू आहे.

चालू ऊस गाळप हंगामात देशातील एकूण ५३३ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. गाळप हंगामात सहभागी झालेल्या ५३३ पैकी २६ कारखान्यांचा गाळप संपल्याने बंद झाले आहे. चालू गाळप हंगामात देशात आतापर्यंत २२६८.२७ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. या गाळप झालेल्या उसातून २२३.६० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

२०२२-२३ या मागील वर्षीच्या हंगामात याच कालावधित ५३४ कारखान्यांनी ऊस गाळप केले होते, तर ३१ कारखान्यांचे गाळप बंद झाले होते. गेल्या हंगामात याच कालावधित २३६२.३० लाख टन उसाचे गाळपातून २२८.८० लाख टन साखर उत्पादित झाली होती.

दरम्यान, गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा साखर उतारा जास्त राहिला आहे. १५ फेब्रवारीपर्यंत देशातील साखर उतारा ९.८६ टक्के इतका आहे. तर, गेल्या हंगामात याच कालावधित साखर उतारा ९.६९ टक्के होता.

चालू हंगामात महाराष्ट्राने ७९.४५ लाख टनसह साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. तर उत्तर प्रदेश साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत ६८.४० लाख टन साखर उत्पादित झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Yield: पंजाबमध्ये अवकाळी, गारपिटीचा गहू उत्पादनाला फटका, एकरी दोन क्विंटलची घट, पीक कापणी प्रयोगातून निष्कर्ष

Sangli Crop Damage: सांगली जिल्ह्यात गारपीट, वादळी पावसाची हजेरी

Land Registration Fees Waived: शेतजमीन वाटणी आता पूर्णपणे होणार मोफत; नोंदणी फी रद्द करण्याचा सरकारचा निर्णय

khandesh Heatwave: खानदेशात उष्णता वाढली

Maharashtra Rain Alert: वादळी पावसाची ४ दिवस शक्यता; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानासह पावसासाल पोषक वातावरण

SCROLL FOR NEXT