Grape Farmer Fraud Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Farmer Fraud : द्राक्ष व्यापाऱ्यांकडून २२ लाखांचा गंडा

Grape Farmer : ठकबाज व्यापाऱ्यांकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या लुटीचे प्रकार कायम आहेत.

मुकूंद पिंगळे

Nashik News : ठकबाज व्यापाऱ्यांकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या लुटीचे प्रकार कायम आहेत. निफाड तालुक्यातील साकोरे मिग येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी हेमंत माणिकराव बोरस्ते यांचा सुमारे २२ लाख ८० हजारांचा द्राक्षमाल विकत घेऊन ८ व्यापाऱ्यांनी पैसे न देताच फरार झाल्याची घटना घडली असून, पिंपळगाव पोलिस ठाण्यात ८ संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकोरे मिग येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी हेमंत माणिकराव बोरस्ते (वय ४२) यांनी जानेवारी २०२४ मध्ये व्यापारी चव्हाण (रा.औद्योगिक वसाहत, महापिंनगर, पुणे), सूरज भीमराव कांबळे (रा. गणेश नगर, बदलापूर), चव्हाण, चव्हाण, मंडल असे तिघे (रा. श्रमिक नगर, दिक्षी रोड, ओझर), गाजीथाला (रा. तिरुपती, कर्नाटक), दौलत भालेराव (रा. तिसगाव, दिंडोरी), तर आर्य जगताप (रा. चिंचखेड, ता. दिंडोरी) यांनी हेमंत बोरस्ते यांच्याकडून सुमारे २२ लाख ८० हजार ८९० रुपयांचा द्राक्षमाल विकत घेऊन पैसे देण्याचे कबूल केले.

मात्र ६ महिने झाले तरी खात्यावर पैसे न आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बोरस्ते यांनी तत्काळ पिंपळगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल वाघ तपास करीत आहे.

द्राक्ष व्यापारी आपले द्राक्ष घेण्यासाठी आल्यानंतर त्यांची संपूर्ण माहिती तसेच त्या व्यापाऱ्यास पिंपळगाव पोलिस ठाण्यात हजर करावे. असे केल्यास त्या व्यापाऱ्याची पूर्ण माहिती काढून मालविक्री करावा. इतर कोणत्याही व्यक्तीवर विश्‍वास ठेवू नये.
- दुर्गेश तिवारी, पोलिस निरीक्षक, पिंपळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT