Sand Excavation Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Sand Excavation : अवैध वाळू उपशाप्रकरणी २२ गुन्हे दाखल

Sand Mafia : अवैध वाळू उपसा आणि वाहतूक केल्याप्रकरणी मागील वर्षभरात महसूल विभागाने पंढरपूर तालुक्यात मोठी कारवाई केली आहे.

Team Agrowon

Pandharpur News : अवैध वाळू उपसा आणि वाहतूक केल्याप्रकरणी मागील वर्षभरात महसूल विभागाने पंढरपूर तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान २२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ४७ वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती तहसीलदार सचिन लंगोटे यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपशाविरोधात महसूल विभागाने कारवाईचे सत्र सुरू केले आहे. मागील वर्षभरात महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमधून जवळपास ४७ लाख ७७ हजार ८१० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मागील वर्षभरात वाळू चोरी विरोध पथकाने वाळू चोरांविरोधात २२ गुन्हे दाखल केले आहेत. कारवाई दरम्यान ४७ वाहने जप्त केली आहेत. भीमा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ४० लाकडी होड्या व पाच तराफे नष्ट केले आहेत. २५ जानेवारीपर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे.

कारवाईमध्ये ४७ प्रकरणांमध्ये ७४ लाख ६६ हजार ४३५ रुपयांचा दंड केला असून, यामधील ३२ प्रकरणांमध्ये ४७ लाख ७७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात महसूल विभागाला यश आले आहे. अवैध वाळू चोरी विरोधात महसूल विभागाने कडक कारवाई सुरू केल्याचेही तहसीलदार सचिन लंगोटे यांनी सांगितले.

वाळू उपशाविरोधी पथकाकडून कारवाई सुरू

भीमा नदीपात्रातील अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगोटे यांनी अवैध वाळू उपसा व वाहतूक विरोधी पथके तयार केली आहेत. या पथकाच्या माध्यमातून कारवाई सुरू केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT