Tribal Agrowon
ॲग्रो विशेष

Tribal Development : धुळ्यातील २१३ आदिवासी गावे होणार ‘उन्नत’

Tribal Village : देशातील दुर्गम, अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान जनजातीय प्रगत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

Team Agrowon

Dhule News : देशातील दुर्गम, अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान जनजातीय प्रगत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, धुळे व शिंदखेडा तालुक्यातील एकूण २१३ आदिवासी गावांना या अभियानाचा लाभ होणार आहे, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी दिली.

आदिवासी समुदाय, आदिवासी बहुल गावे आणि आकांक्षित जिल्ह्यातील आदिवासी समुदाय, आदिवासी कुटुंबांची सामाजिक, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानास मंजुरी दिली आहे. आदिवासी क्षेत्र आणि समुदायांच्या सर्वांगीण आणि शाश्‍वत विकासासाठी भारत सरकारच्या विविध योजनांचा लाभ या अभियानाच्या माध्यमातून या गावांना देण्यात येणार आहे.

या लाभांचा समावेश

यामध्ये आदिवासी समाज ज्या गावामध्ये वास्तव्यास आहे अशा प्रत्येक गावाचा व त्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंब व लाभार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून रस्ते, पक्की घरे, पाण्याची व्यवस्था, विद्युत पुरवठा, अंगणवाडी केंद्र बांधणे, पोषण स्थिती सुधारणे, कौशल्य विकास प्रशिक्षण देणे, कृषी विभागाच्या योजनेचा लाभ देणे, मत्स्यव्यवसाय करण्यास चालना देणे, पर्यटनाचा विकास करणे, शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृह यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे इत्यादी विविध प्रकारचे लाभ देण्याची कार्यवाही नियोजनबद्धरीत्या पुढील पाच वर्षामध्ये करण्यात येणार आहे.

‘पीएम जनमन'' अभियानात एकूण १७ मंत्रालय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध २५ उपक्रमांचा समावेश करून हे सर्व लाभ देण्यात येणार आहेत. यामुळे आदिवासी बहुल गावांचा सर्वांगीण विकास होणार असून, आदिवासी समाजाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती उंचावण्यास मदत होणार आहे.

योजनांचा लाभ घ्या

धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, धुळे व शिंदखेडा तालुक्यातील एकूण २१३ गावे, पाडे, वस्तीमधील आदिवासी समाजाच्या सर्व पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांनी या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागामार्फत करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Loan Concessions: उद्योगपतींप्रमाणे हव्यात शेतकऱ्यांना सवलती: शरद पवार

Farmer ID Registration Challenges: चाळीस टक्के पीकक्षेत्र अद्याप फार्मर आयडीविना; ॲग्रीस्टॅकच्या अंमलबजावणीत राज्यांसमोर नोंदणीचे आव्हान

Farm Loan Waiver Scheme: कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता जमा

Cooperative Sugar Mills Loan: सहकारी कारखान्यांना सवलतीने कर्ज शक्य; ‘सहकार’चा वित्त विभागाकडे प्रस्ताव

Maharashtra Monsoon Prediction: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT