Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : सिंचन योजनेतून शेतीसाठी २१ टीएमसी पाणी

Irrigation Scheme : जिल्ह्यात ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीत टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करून दुष्काळी पट्ट्यातील शेतीला पाणी दिले.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीत टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करून दुष्काळी पट्ट्यातील शेतीला पाणी दिले. या नऊ महिन्यात तिन्ही सिंचन योजनेतून तब्बल २१ टीएमसी पाणी उचलले.

त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने बळीराजा सुखावला असल्याने ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी मिळल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली. या नऊ महिन्यांच्या कालावधीत सिंचनापोटी ७६ कोटी ५१ लाखांचे वीजबिल आले आहे.

जिल्ह्यात गतवर्षी पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. सिंचन योजना सुरू करून शेतीसाठी पाणी देण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली होती. त्यातच जिल्हा प्रशासनानेही पाण्याची स्थितीचा आढावा घेत सिंचन योजना सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ऑक्टोबरपासून ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजना सुरू केल्या.

ऑक्टोबरमध्ये ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजना सुरू करून १२.०४ टीएमसी इतके पाणी उचलले. त्यापैकी ४.९१ टीएमसी पाणी शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, सिंचन योजनेतून दिलेले पाणी कमी पडू लागले.

त्यामुळे पुन्हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी असे चार महिने सिंचन योजना सुरू ठेवली. या चार महिन्यांच्या आवर्तनाच्या कालावधीत ७.४९ टीएमसी इतके पाणी शेतीसाठी सोडले होते.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने सिंचन योजनांचे आवर्तन सुरू करण्यात आले होते. त्यानुसार मार्च ते जून २०२४ या चार महिन्यांत १६.६२ टीएमसी पाणी उचलून ९.३२ टीएमसी पाणी शेतीला दिले. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना तब्बल नऊ महिने सुरू ठेवल्या.

या आवर्तनातून मिरज, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, विटा, खानापूर, तासगाव तालुक्यातील शेतीला पाणी उपलब्ध करून दिल्याने सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी मिळाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली. या नऊ महिन्याच्या कालावधीत सिंचनापोटी ७६ कोटी ५१ लाखांचे वीजबिल आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT