Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : पहिल्याच पावसात २१ तलाव फुटले

Rain Update : जुलै महिन्यात संततधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. पावसामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली.

Team Agrowon

Chandrapur News : जुलै महिन्यात संततधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. पावसामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. पावसाचा मोठा फटका जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागालाही बसला. जिल्ह्यातील तब्बल २१ मामा तलाव फुटले. जवळपास ४७ माजी मालगुजारी तलाव धोकादायक स्थितीत आहेत.

जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत एक हजार ६७८ माजी मालगुजारी तलाव आहेत. यातून ३४ हजार ५१३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. या तलावांची पाणी साठवणूक क्षमता एक कोटी ३ हजार ३५६ दलघमी इतकी आहे. गेल्या काही वर्षांपासून माजी मालगुजारी तलावांच्या देखभाल दुरुस्तीकडे राज्य शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.

परिणामी, अनेक तलावांवर अतिक्रमण वाढले. काही तलाव बुजले आहेत. मधल्या काळात माजी मालगुजारी तलावांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्‍न जिल्हा परिषद सदस्यांनी सभागृहात उचलून धरला. त्याची दखल घेत माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीसाठी माजी मालगुजारी तलाव पुनरुज्जीवन अभियान हाती घेण्यात आले. यातून कोट्यवधींचा निधी मिळाला.

अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात पाचशेवर तलावांची दुरुस्ती करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात ४६० माजी मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जाणार होती. त्यासाठी १२० कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला.

निविदा निघून या कामांना सुरुवात होणार होती. मात्र लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. आचारसंहितेमुळे माजी मालगुजारी तलावांची दुरुस्ती मागे पडली. आचारसंहिता संपल्यानंतर ही कामे सुरू होणार होती. मात्र पावसाळा लागला तरी या कामांना सुरुवात झाली नाही.

पिकांचे नुकसान

सर्वाधिक माजी मालगुजारी तलाव नागभीड तालुक्यात फुटले. त्यानंतर चंद्रपूर, सिंदेवाही तालुक्यांतील माजी मालगुजारी तलावांचा समावेश आहे. तलाव फुटल्याने शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT