Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : अतिवृष्टिबाधितांच्या मदतीसाठी २०४ कोटींचा निधी

Heavy Rain Crop Loss : पूरस्थितीमुळे शेतीपिके व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या बाधितांना मदत देण्यासाठी जिल्ह्याला २०४ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीस शासनाने मंजुरी दिली आहे.

Team Agrowon

Yavatmal News : पूरस्थितीमुळे शेतीपिके व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या बाधितांना मदत देण्यासाठी जिल्ह्याला २०४ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीस शासनाने मंजुरी दिली आहे. अमरावती विभागात जिल्ह्याला सर्वाधिक निधी मंजूर झाला असून, या निधीमुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना दिलासा मिळणार आहे.

राज्यात नैसर्गिक आपत्तिबाधितांच्या मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्‍चित केलेल्या दरानुसार एकूण एक हजार ७१ कोटी ७७ लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा जीआर महसूल व वनविभागाकडून बुधवारी (ता.४) जारी करण्यात आला.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे, यासाठी शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.

अतिवृष्टी, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यांत होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

विभागीय आयुक्तांनी जून ते जुलै या महिन्यांत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्यानुसार निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे.

अडीच लाख शेतकरी बाधित

जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे दोन हेक्टरपर्यंत बाधित क्षेत्र दोन लाख १७ हजार २४१.५७ हेक्टर एवढे आहे. त्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या दोन लाख ६३ हजार ६०९ आहे. बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १८५ कोटी दहा लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे. शेतजमिनीच्या नुकसानग्रस्त दहा हजार ७५७ हेक्टर ७३ आर. क्षेत्रासाठी १९ कोटी ७६ लाख ६३ हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT