Papaya Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Papaya Damage News : नाशिकमध्ये पपईंची २०० झाडे अज्ञाताने तोडली

Papaya Cultivation Update : सटाणा तालुक्यातील कौतिकपाडे येथील शेतकरी दगा रूंजा पवार यांच्या दोन एकर क्षेत्रातील बहार धरलेली २०० पपईंची झाडे अज्ञातांनी सोमवारी (ता.८) तोडली.

Team Agrowon

Nashik Agriculture News : सटाणा तालुक्यातील कौतिकपाडे येथील शेतकरी दगा रूंजा पवार यांच्या दोन एकर क्षेत्रातील बहार धरलेली २०० पपईंची झाडे अज्ञातांनी सोमवारी (ता.८) तोडली. त्यामुळे पवार यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कौतिकपाडे शिवारात दगा पवार यांनी तीन महिन्यांपूर्वी पपईची लागवड केली होती. लागवड खर्च, अंतर मशागत, कीटकनाशकांची फवारणी यावरच लाखांपेक्षा अधिक खर्च झाला. पपईचा बहार धरून नुकतीच फळधारणा सुरू झाल्याने संपूर्ण शेत बहरले होते.

मात्र अज्ञाताने सोमवारी (ता.८) रात्री आठच्या सुमारास २०० पेक्षा अधिक पपईची झाडे तोडली. मंगळवारी (ता. ९) सकाळी पवार हे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

पोटच्या पोराप्रमाणे वाढविलेल्या पपईच्या झाडांची कत्तल पाहून पवार यांनी हंबरडा फोडला. पवार यांनी सटाणा पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. सटाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप रणदिवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT