Dhamani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Dhamani Dam : धामणी धरणात २० टक्के साठा शिल्लक

Dhamani Dam Water Stock : पालघर जिल्ह्यामधील महत्त्वाची धरणे असलेली धामणी आणि कवडासमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे.

Team Agrowon

Palghar Water News : पालघर जिल्ह्यामधील महत्त्वाची धरणे असलेली धामणी आणि कवडासमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. जून महिन्याची २२ तारीख आली तरी सध्या कडक ऊन असल्याने पाण्याच्या पातळीत घट झाली आहे.

धरणात २०.१६ टक्के पाणीसाठा आहे, मात्र नागरिकांना पाण्यासंबंधी कोणत्याही काळजीचे कारण नाही, असे अभियंता प्रवीण भुसारे यांनी सांगितले.

धामणी धरणाचा पाणी साठवणूक क्षमता ९९.८५ मीटर इतकी आहे. मात्र सध्या या धरणाच्या साठ्यामध्ये पाण्याचा साठा ५५.७२५ दशलक्ष घनमीटरपर्यंत पोहोचला आहे.

तर कवडास या धरणातील पाणी क्षमता साठवणूक क्षमता ६४.६५ मीटर असून यामध्ये सध्या ८.२१० दशलक्ष घन मीटर पाणीसाठा असून आहे.

सूर्या प्रकल्पातील या धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्यातून सिंचनासाठी शेकडो गावांतील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा केला जातो. वसई-विरार, तारापूर, बोईसर, मिरा-भाईंदर

या परिसरात पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी या दिवशी म्हणजे २२ जून २०२२ रोजी धामणी धरणात २१.६० टक्के पाणी होते. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी साठा कमी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Rummy Video : रमी खेळण्याचा विषय छोटा; बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे

Rural Development: सोसायट्या ठराव्यात विकास केंद्र

Bhimashankar Darshan: श्री क्षेत्र भीमाशंकर दर्शनासाठी जादा बस

Junnar Tourism: जुन्नर पर्यटन आराखडा अधिवेशनात दुर्लक्षित

Expired Pesticides: जुन्या कीटकनाशकांची नव्या पॅकिंगमधून विक्री

SCROLL FOR NEXT