Nanded Apmc Election
Nanded Apmc Election Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded Apmc Election Update : नांदेड बाजार समितीच्या निवडणुकीत २० अर्ज बाद

Team Agrowon

Nanded News : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nanded Agriculture Produce Market Committee) निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या २० उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले आहेत. या सोबतच नायगाव बाजार समितीला पाच तर कुंटूर बाजार समिती (Market Committee) सात अर्ज बाद झाले आहेत.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी २७ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान २९२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जाची छाननी बुधवारी (ता. ५) झाली. यात वीस जणांचे अर्ज बाद झाले आहेत.

या निवडणुकीत शेतकऱ्यांना निवडणूक अर्ज दाखल करण्याची संधी दिल्यामुळे अर्जाची संख्या मोठी झाली आहे. यासोबतच अनेक जणांनी अपक्ष ही अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या महाविकास पक्षाच्या घटक पक्षाची आघाडी बिघडल्यास स्वतंत्र लढता यावे यासाठी सर्वच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

तर युतीमधील भाजप आणि शिवसेनेच्या पक्षाकडूनही स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

नांदेड बाजार समिती सोबतच इतर चार बाजार समितीची निवडणूक होत आहे. नायगाव बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये ९० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

यापैकी छाननीमध्ये पाच अर्ज बाद ठरले आहेत. तर कुंटूर बाजार समितीसाठी ९० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील येथील सात उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

Jaljeevan Mission : रायगडमध्ये जलजीवनची निम्‍मी कामे अपूर्ण

Mango Market : उरणमध्ये आंब्यांची आवक वाढली

Water Scarcity : पाणीपुरवठा संस्थांचे शेतकरी पाणी टंचाईच्या कात्रीत

SCROLL FOR NEXT