Parbhani News : जिल्ह्यातील २२ पैकी ११ लघू प्रकल्पांमध्ये गुरुवारी (ता.१४) सरासरी १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. जिल्ह्यातील १ लघू प्रकल्प तलाव कोरडा पडला आहे तर ७ लघू प्रकल्पांच्या तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. दोन मध्यम प्रकल्पात सरासरी १९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.येत्या काळात उपसा, बाष्पीभवन आदी कारणांमुळे प्रकल्पांतील पाणीसाठा कमी झाल्यानंतर पाणीटंचाईची समस्या गंभीर होऊ शकते.
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे परभणी जिल्ह्यातील अनेक तलावांतील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली.उपसा देखील काही दिवस बंद राहिला.तापमानात घट झाली.बाष्पीभवनाचा वेग कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा गेल्या काही दिवसांत फारशी घट कमी झाली होती.परंतु परत उपसा सुरु झाल्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट होत आहे.
जिल्ह्यातील लघू प्रकल्पांमध्ये गुरुवारी (ता. १४) सरासरी १३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.त्यात पेडगाव (ता.परभणी) येथील तलावात ८ टक्के, वडाळी (ता. जिंतूर) येथील तलावात २ टक्के, आडगाव (ता. जिंतूर) येथील तलावात २५ टक्के, चिंचोली (ता.जिंतूर) येथील तलावात ४ टक्के,भोसी (ता.जिंतूर) येथील तलावात १० टक्के, कवड (ता. जिंतूर) येथील तलावात २ टक्का, मांडवी (ता. जिंतूर) येथील तलावात २ टक्के, पाडाळी (ता. जिंतूर) येथील तलावात ५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.
आंबेगाव (ता.मानवत) येथील तलावात ६ टक्के, झरी (ता. पाथरी) येथील तलावात ९७ टक्के, पिंपळदरी (ता. गंगाखेड) येथील तलावात २० टक्के,राणीसावरगाव (ता. गंगाखेड) येथील तलावात ५६ टक्के, टाकळगाव (ता.गंगाखेड) येथील तलावात १३ टक्के,तांदुळवाडी (ता.पालम) येथील तलावात ५१ टक्के पाणीसाठा होता.चारठाणा (ता.जिंतूर) लघू प्रकल्प कोरडा आहे.
देवगाव,जोगवाडा,बेलखेडा,केहाळ,दहेगाव (सर्व ता.जिंतूर),नखावाडी (ता.सोनपेठ),कोद्री (ता.गंगाखेड) या ७ लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.गतवर्षी (२०२२) याच तारखेला लघुतलावांत सरासरी ३०.५५५ दलघमी ( ७२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता.
मध्यम प्रकल्पात १९ टक्के पाणीसाठा
परभणी जिल्ह्यातील निवळी (ता.जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्पाच्या जलाशयात गुरुवारी (ता.१४) पर्यंत ७.५१९ दलघमी (३० टक्के) तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये २.३६८ दलघमी (९ टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता आहे.
दोन्ही प्रकल्पांत सरासरी १९ टक्के पाणीसाठा आहे.गतवर्षी (२०२२) याच तारखेला करपरा मध्यम प्रकल्पात ९५ टक्के, तर मासोळी मध्यम प्रकल्पात ८९ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. मॉन्सूनोत्तर पावसामुळे या दोन मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.