MPKV  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Variety : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे १८ वाण देशपातळीवर प्रसारित

MPKV Update : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या विविध पिकांच्या १८ वाणांना केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अधिसूचित करण्यात आले आहेत.

Team Agrowon

Ahilyanagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या विविध पिकांच्या १८ वाणांना केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अधिसूचित करण्यात आले आहेत.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाला यश प्राप्त झाले आहे. केंद्राने देशभरातील अधिसूचित केलेल्या वाणांच्या यादीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या १८ वाणांचा समावेश झाल्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये होत असलेल्या संशोधनाची दखल देशपातळीवर घेण्यात आली आहे.

या वेळी कुलगुरू डॉ. पाटील आणि संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे या वर्षी सर्वांत जास्त वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित झाले आहेत. यामुळे विद्यापीठाने प्रसारित केलेल्या वाणांचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, शेतकरीभिमुख संशोधन करीत आहेत, असे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले.

प्रसारित केलेले वाण

भात (फुले कोलम), मका (फुले उमेद व फुले चॅम्पियन), ज्वारी (फुले पूर्वा), करडई (फुले भूमी), तूर (फुले पल्लवी), मूग (फुले सुवर्ण), उडीद (फुले राजन), राजमा (फुले विराज), ऊस (फुले १५०१२), घेवडा (फुले श्रावणी), गहु (फुले अनुराग), कापूस (फुले शुभ्रा), टोमॅटो (फुले केसरी), चेरी टोमॅटो (फुले जयश्री), घोसाळे (फुले कोमल), वाल (फुले सुवर्ण) व मेथी (फुले कस्तुरी).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT