Cotton and Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Soybean Subsidy : बुलडाण्यातील ४.१५ लाखांवर शेतकऱ्यांना १७० कोटींचा लाभ

Agriculture Subsidy : गेल्या अनेक दिवसांपासून या निधीची प्रतीक्षा लागून होती. गेल्या हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे शासनाने सोयाबीन व कापूस उत्पादकांना हेक्टरी ५ हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले होते.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस उत्पादकांना सुमारे १७० कोटींचे भावांतर अनुदान मंगळवारी (ता. १) जिल्ह्यातील सुमारे चार लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. गेल्या अनेक दिवसांपासून या निधीची प्रतीक्षा लागून होती.

गेल्या हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे शासनाने सोयाबीन व कापूस उत्पादकांना हेक्टरी ५ हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. दोन हेक्टर मर्यादेत ही मदत देणार असे सांगण्यात आले. यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून शासनाकडे पाठवण्यात आल्या होत्या. या शेतकऱ्यांना शासनाने मंगळवारी (ता. १) मदत वळती केली. रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा झाला.

जिल्ह्यातील चार लाख १५ हजार २४२ शेतकरी पात्र लाभार्थी आहेत. यात ९०,९९० हे कापूस उत्पादक तर ३ लाख २४ हजार २५२ हे सोयाबीन उत्पादक आहेत. या शेतकऱ्यांना १७० कोटी ६३ लाख ९६ हजार रुपये अनुदान वळती झाले आहे.

यात कापूस उत्पादकांना ३७ कोटी १७ लाख ९० हजार तर सोयाबीन उत्पादकांना १३३ कोटी ५० लाख रुपये अनुदानाचा समावेश आहे. चिखली तालुक्यात सोयाबीन व कापूस उत्पादकांना सुमारे २१ कोटी ४४ लाख, बुलडाण्यात १४ कोटी ५२ लाख, मेहकर २० कोटी ७९ लाख, सिंदखेडराजा १८ कोटी ११ लाख अशी काही तालुक्यांत मदत मिळालेली आहे.

तालुकानिहाय प्राप्त मदत व पीक

तालुका कापूस सोयाबीन

खामगाव ४ कोटी ९१ लाख ११ कोटी ६२ लाख

चिखली २० लाख ७२ हजार २१ कोटी २३ लाख

जळगाव जा. २ कोटी ८५ लाख ५ कोटी ३ लाख

देऊळगावराजा २ कोटी ९७ लाख ५ कोटी ५५ लाख

नांदुरा ४ कोटी ३४ लाख ४ कोटी ७८ लाख

बुलडाणा ३५ लाख ८२ हजार १४ कोटी १७ लाख

मलकापूर ४ कोटी ६४ लाख २ कोटी ८० लाख

मेहकर १८ लाख ४० हजार २० कोटी ६१ लाख

मोताळा ९ कोटी ७ लाख ३ कोटी ४१ लाख

लोणार ५८ लाख ५३ हजार १३ कोटी २६ लाख

शेगाव १ कोटी ४८ लाख ८ कोटी ५१ लाख

संग्रामपूर १ कोटी ९० लाख ७ कोटी ९५ लाख

सिंदखेडराजा ३ कोटी ५८ लाख १४ कोटी ५२ लाख

एकूण ३७ कोटी १३ लाख १३३ कोटी ५० लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT