Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Rain Update : धरण क्षेत्रातील मुसळधारेने १७ धरणे तुडूंब

Rain News : पावसाळ्याचे जवळपास दोन महिने पूर्ण झाले आहे. या कालावधीत कमीअधिक स्वरूपात पाऊस पडला आहे. विशेषतः धरण क्षेत्रांत पावसाने जोरदार हजेरी लावली.

Team Agrowon

Pune News : पावसाळ्याचे जवळपास दोन महिने पूर्ण झाले आहे. या कालावधीत कमीअधिक स्वरूपात पाऊस पडला आहे. विशेषतः धरण क्षेत्रांत पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील २६ धरणांपैकी आतापर्यंत जवळपास १७ धरणे भरली आहेत. सर्व धरणांत एकूण १७०.३२ टीएमसी म्हणजेच ८६ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

यंदा जून महिन्यात कमी पाऊस झाला होता. त्यामुळे चालू वर्षी पुरेसा पडतो की नाही, अशी स्थिती झाली होती. परंतु सात जूनच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यानंतर जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी होता. परंतु दुसऱ्या आठवड्यात पावसाने चांगलाच जोर लावून धरला.

त्यामुळे पश्चिम पट्यातील भात खाचरे भरून वाहू लागल्याने धरणांत नव्याने पाण्याची आवक सुरू झाली. त्यानंतर पावसाने काहीशी उघडीप दिल्यानंतर आता पुन्हा पावसाने चांगलाच जोर धरला आहे. रविवारी (ता. ४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सर्व धरणांत २१.२२ टीएमसी एवढी नव्याने पाण्याची आवक झाली आहे.

त्यामुळे तीन धरणे शंभर टक्के भरली असून १४ धरणांत ९० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. या धरणातून कमीअधिक प्रमाणात डाव्या व उजव्या कालव्याला व विद्युतगृहासाठी आणि सांडव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

जिल्ह्यात एकूण धरणांची उपयुक्त पाणीसाठा क्षमता ही १९८.३२ टीएमसी एवढी आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत या धरणांत ११४.५६ टीएमसी म्हणजेच ५७ टक्के एवढा पाणीसाठा झाला होता. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे.

सध्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांत पाण्याची आवक वाढली आहे. तर एक जूनपासून मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरणांत ४४.८२ टीएमसी एवढा पाणीसाठा नव्याने दाखल झाला आहे.

नीरा खोऱ्यातील पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडीवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर या धरणांत ६५.२२ टीएमसी, तर कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड या धरणांत ३२.५२ टीएमसी, याशिवाय उजनी ७७.१० टीएमसी, मुळशी २४.८० टीएमसी एवढा नव्याने पाणीसाठा दाखल झाला आहे.

यामुळे जिल्ह्यातील उर्वरित धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. काही धरणे भरली असल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने मुठा, पवना, भीमा, आरळा, इंद्रायणी, कानंदी, कुकडी, मीना, कुकडी, घोड या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

रविवारी (ता.४) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला धरणक्षेत्रनिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये :

मुळशी २१२, टेमघर ११५, वरसगाव ७६, पानशेत ७२, खडकवासला ११, पवना ९८, कळमोडी ४३, चासकमान २६, भामा आसखेड ५६, आंध्रा ५९, वडीवळे ९९, नाझरे ५, गुंजवणी ९२, भाटघर २०, निरा देवघर ८४, पिंपळगाव जोगे ४६, माणिकडोह ४५, येडगाव २०, वडज ४५, डिंभे ६०, चिल्हेवाडी ४१, घोड १, उजनी २.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

SCROLL FOR NEXT