Krushi Bharari Pathak Agrowon
ॲग्रो विशेष

Krushi Bharari Pathak : कृषी निविष्ठेसाठी नांदेड जिल्ह्यात १७ भरारी पथके

Agriculture Department : नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते व किटकनाशके गुणवत्तापूर्ण व रास्तभावात मिळण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते व किटकनाशके गुणवत्तापूर्ण व रास्तभावात मिळण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

या पथकामार्फत बाजारात उपलब्ध होणाऱ्या बियाणे, खते व किटकनाशक विक्रेते व उत्पादक यांच्या नियमित तपासण्या करण्यात येणार आहेत. कृषी विभागामार्फत जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर १६ असे एकूण १७ भरारी पथके स्थापन करण्यात आले आहेत.

खरीप हंगामामध्ये कृषिसेवा केंद्र चालक किंवा खासगी एजंन्ट मार्फत शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे खते-बियाणे व किटकनाशके विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्राची नियमित तपासणी करण्यात येत असते.

सर्व निविष्ठांचे व्यवस्थीत वाटप व चांगल्या प्रतिच्या निविष्ठा शेतकऱ्यांना मिळतील, निविष्ठासाठी अडवणूक होणार नाही यासाठी भरारी पथक काम करणार आहे.

त्याचबरोबर कृषी निविष्ठा विक्रीमध्ये गैरव्यवहार, साठेबाजी, ज्यादा दराने विक्री, असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास उत्पादक, विक्रेत्यांचे परवाने निलंबित किंवा रद्द करण्यात येतील. शिवाय फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

तालुकास्तरावर भरारी पथकामध्ये तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती, निरीक्षक वजन व मापे व मंडळ कृषि अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm To Market: आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवले ‘फार्म टू मार्केट’ तंत्र

Crop Insurance Delay: मंगळवेढ्यातील ३० हजार शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत

Water Levels Drop: गिरणा धरणातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट

Hailstorm Prediction : दोन दिवस गारपीटीचा अंदाज; राज्यात पुढील ५ दिवस पावसाला पोषक वातावरण

Acumen Angel Award 2025: ‘अकुमेन एंजेल अॅवॉर्ड २०२५’ साठी अमितकुमार नाफडे यांची निवड

SCROLL FOR NEXT