Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : पुणे विभागात १६९ लाख टन उसाचे गाळप

Sugarcane Season : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास साडेतीन महिने झाले आहे. आतापर्यंत विभागात असलेल्या ३४ साखर कारखान्यांपैकी ३१ साखर कारखान्याने गळीत हंगाम सुरू केला आहे.

Team Agrowon

Pune News : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास साडेतीन महिने झाले आहे. आतापर्यंत विभागात असलेल्या ३४ साखर कारखान्यांपैकी ३१ साखर कारखान्याने गळीत हंगाम सुरू केला आहे. यंदा सुरू झालेले कारखानेही बऱ्यापैकी क्षमतेने सुरू आहे. या कारखान्यांनी १६९ लाख ३२ हजार २५० टन उसाचे गाळप केले आहे.

त्यातून १७१ लाख ४ हजार ६९० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, साखर उतारा १०.१ टक्के एवढा आहे, अशी माहिती पुणे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. चालू वर्षी उसाची उपलब्धता अधिक असल्याने शासनाने एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र उशिराने झालेल्या पावसामुळे गळीत हंगाम सुरू होण्यास विलंब झाला.

त्यामुळे अनेक साखर कारखान्यांनी उशिराने साखर कारखाने सुरू केले होते. विभागातील पुणे, सातारा जिल्ह्यांतील १० नोव्हेंबरनंतर साखर कारखान्यांचे धुराडे पेटवत गाळप हंगाम सुरू केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक कारखान्याचाही गळीत हंगाम सुरू केला होता.

पुणे विभागात सहकारी आणि खासगी असे एकूण जवळपास ३४ साखर कारखाने आहेत. पुणे जिल्ह्यातील पूर्व, उत्तर भागात तर सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत उसाचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते.

गेल्या वर्षी उशिराने झालेल्या पावसामुळे आणि पाणीटंचाईमुळे उसाच्या लागवडीत घट झाली असल्याची स्थिती आहे. सध्या मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी मजुराद्वारे केली जात आहे. त्यासोबत अनेक साखर कारखान्यांनी ऊसतोडणी यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे साखर कारखाना कार्यस्थळावर ऊस उपलब्ध होत असल्याने वर्दळ आहे.

जिल्हानिहाय झालेले उसाचे गाळप ः

जिल्हा --- सुरू कारखाने --- ऊस गाळप (टन) -- साखर (क्विंटल) -- साखर उतारा

पुणे -- १४ -- ९५,६५,८४०--- ९६,४३,६२५ -- १०.०८

सातारा -- १७ -- ७३,६६,४१०-- ७४,६१,०६५ -- १०.१३

एकूण -- ३१ -- १६९,३२,२५०-- १७१,०४,६९०--१०.१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT